“विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती”; मनसेतील मुस्लिम पदाधिकऱ्याची फेसबुकवर पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 05:49 PM2022-04-13T17:49:15+5:302022-04-13T17:50:33+5:30
राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसे विभाग प्रमुख बादशहा शेख यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने, मुस्लिम पदाधिकाऱ्यात हलचल निर्माण झाली आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर: ठाणे येथील राज ठाकरे यांची सभा झाल्यानंतर पक्षाचा विभाग प्रमुख बादशहा शेख यांनी फेसबुकवर विठ्ठला झेंडा कोणता घेऊ हाती अशी पोस्ट टाकल्याने, पक्षातील मुस्लिम पदाधिकाऱ्यात हलचल निर्माण झाली. मात्र, शहर संघटक मैंनुद्दीन शेख यांनी मुस्लिम पदाधिकारी ठाकरे साहेबांसोबत असल्याची प्रतिक्रिया दिली.
उल्हासनगरातीलमनसे मध्ये शहर संघटक मैनुद्दीन शेख, विभाग प्रमुख बादशहा शेख यांच्यासह असंख्य पदाधिकारी मनसेत सक्रिय आहेत. ठाणे येथील सभेपूर्वी मैनूद्दीन शेख यांनी शहरातील मनसेचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्यासोबत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली हाती. दरम्यान राज ठाकरे यांच्या सभेनंतर विभाग प्रमुख बादशहा शेख याने फेसबुकवर विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. अशी पोस्ट टाकून खळबळ उडून दिली. बादशह शेख यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, झाला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र शहर संघटक मैनूद्दीन शेख यांनी मात्र बादशहा शेख मनसे मध्ये राहणार असल्याचे सांगितले.
मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, माजी शहराध्यक्ष संजय घुगे यांनीही बादशहा शेख यांच्या फेसबुक वरील पोस्टवर आश्चर्य व्यक्त केले. तसेच शहरातील मनसे मधील मुस्लिम समाजाचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्यावर खुश असून कोणीही पक्ष सोडून जाणार नाही. अशी प्रतिकीया दिली. एकूणच मनसे मधील मुस्लिम समाजाचे पदाधिकारी वरवर शांत असलेतरी कुठून तरी धूर निघतो. अशी प्रतिक्रिया पक्षातील पक्षातील काही पदाधिकार्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याचा अटीवर दिली आहे.