मनसे-राष्ट्रवादीचा अवघा रंग एक झाला, परांजपे अन् जाधवांची एकमेकांवर रंगांची उधळण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 01:53 PM2019-03-21T13:53:57+5:302019-03-21T14:05:27+5:30

बुरा ना मानो होली है म्हणत ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावून लोकसभा निवडणुकीत आपला एकच रंग असल्याचे संकेत दिले आहेत.

MNS-NCP together in celebrate holi in thane | मनसे-राष्ट्रवादीचा अवघा रंग एक झाला, परांजपे अन् जाधवांची एकमेकांवर रंगांची उधळण

मनसे-राष्ट्रवादीचा अवघा रंग एक झाला, परांजपे अन् जाधवांची एकमेकांवर रंगांची उधळण

Next

ठाणे : बुरा ना मानो होली है म्हणत ठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना रंग लावून लोकसभा निवडणुकीत आपला एकच रंग असल्याचे संकेत दिले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी एकमेकांना रंग लावून येत्या २३ मे रोजी एकत्रच गुलाल उधळू असे जाहीर केले आहे. अविनाश जाधव आणि आनंद परांजपे यांच्या या भूमिकेमुळे ठाण्यात मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले असून शिवसेनेला ही निवडणूक आता फारशी सोपी नसल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .

रंगमंचामीच्या निमित्ताने ठाण्यात पक्ष आणि राजकीय मतभेद विसरून एकमेकांना रंग लावण्याची परंपरा तशी जुनीच आहे. मात्र यंदाही वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्याने यावेळी या सणाला राजकीय रंग चढला होता. राज ठाकरे यांनी या आधीच आपला पक्ष निवडणूक लढवणार नसल्याचे सांगून अद्याप कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र ठाण्यात रंगपंचमीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकाच रंगात भिजताना दिसले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे त्यांच्या कार्यकर्त्यांसह मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना रंगपंचीमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परांजपे आणि जाधव या एकमेकांना एकाच रंग लावून आपला एकच रंग असल्याचं जाहीर केले. विशेष म्हणजे मनसेने आयोजित केलेल्या धुलीवंदनाच्या कार्यक्रमात आनंद परांजपे यांना निमंत्रित करण्यात आले होते.

ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांची उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे विचारे आणि परांजपे यांच्यामध्ये थेट लढत होणार असून, जर मनसेचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा मिळाल्यास शिवसेना पक्षाच्या अडचणी काही प्रमाणात वाढणार असल्याने ठाणे लोकसभेची निवडणूक शिवसेनेला काही प्रमाणात कठीण जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

" होळीच्या सर्वाना शुभेच्छा देताना मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना देखील शुभेच्छा दिल्या आहेत . त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही . मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी रंगपंचमी साजरी केली असून २३ मे आम्ही गुलाल उधळू हि आम्हाला खात्री आहे "
- आनंद परांजपे , अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे

" आमचा रंग हा एकच रंग आहे . देशात जे सुरु आहे त्यापेक्षा आम्ही चांगले रंग उधळायला सुरुवात केली असून २३ मे रोजी उडणारा रंग चांगल्या पर्यायाची नांदी असेल असा माझा विश्वास आहे . "
- अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष, मनसे

Web Title: MNS-NCP together in celebrate holi in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.