स्वच्छता सर्व्हेक्षणाच्या कारभारावर मनसेचा आक्षेप, आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 05:04 PM2018-03-14T17:04:34+5:302018-03-14T17:04:34+5:30
स्वच्छता सर्व्हेक्षणाच्या कारभारावर मनसेने आक्षेप घेतला आहे. घनकचरा विभागातील अधिकाऱयांनी केलेल्या या गोलमालची चौकशी करण्याची मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
ठाणे - स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोठा गाजावाजा करत तयार केलेल्या स्वच्छता अँपचा ठामपा अधिकाऱयांनी दुरुपयोग करत शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घनकचरा विभागातील अधिकाऱयांनी केलेल्या या गोलमालची चौकशी करण्याची मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
स्वच्छता सर्व्हेक्षण अंतर्गत तयार केलेल्या अँपवर नागरिकांनी पारी केल्यास तात्काळ पारनिवारण केले जाते, असा दावा ठाणे महापालिकेकडून केला जात आहे. मात्र ठाणेमहानगरपालिकेतील काही सफाई कर्मचाऱयांनी वेगळीच तक्रार मनसेकडे केली आहे. ठाणेकर नागरिकांनी स्वच्छता अँप डाऊनलोड करुन विभागात कोठे अस्वच्छता दिसल्यासत्याचे फोटो काढून स्वच्छता अँप वर पाठविण्याचे आवाहन केले होते. मात्र पालिकेच्या काहीहुशार कर्मचाऱयांनी प्रभागातील नागरिकांकडून मोबाईल क्रमांक व त्याचा ओटीपी कोड (वनटाईम पासवर्ड) आधिच घेऊन ठेवले आहेत. ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱयांकडूनकचरा पडलेल्या ठिकाणाचे फोटो काढले जात आहेत. त्यानंतर जमविलेल्यामोबाईल क्रमांक व ओटीपी क्रमांकाचा वापर करुन एकच समस्या अधिकमोबाईल क्रमांकावरुन आल्याची नोंद करुन ती सोडविली असल्याचा दावा करत स्वत:ची पाठथोपटून घेण्याचा प्रकार सुरु आहे. विशेष म्हणजे या अँपचा वापर सफाई कर्मचारीच स्वत:च्यामोबाईल वरुन करत असून अँपचीही पोलखोल झाली आहे.
ठाणे महापालिकेचा स्वच्छ भारत अभियांतर्गत सर्वेक्षणामध्ये पहिला क्रमांक यावा यासाठी हाप्रकार सुरु असून कर्मचाऱयांवर दबाब आणला जात आहे. ही एक प्रकारे शासनाची फसवणूकअसल्याची तक्रार संदीप पाचंगे यांनी केली आहे.
ठाणे शहरातील घाणीने भरलेल्या एका नाल्याचे छायाचित्र काही नागरिकांनी स्वच्छता अँपवरटाकले असता दुसऱया दिवशी तक्रार निवारण झाल्याचे दाखविले गेले. प्रत्यक्षात मात्रपरिस्थिती जैसे थे होती. हे सर्व पुराव्यानीशी संदीप पाचंगे यांनी पालिका आयुक्तांकडे सादरकेले आहे. आपले सरकार पारदर्शक कारभार, स्मार्ट सिटी या सर्व चांगल्या बाबी घोषणे पुरत्याअसल्याचे संदीप पाचंगे यांनी म्हटले आहे.