मनसे पदाधिकाऱ्यांच्या नाशिक सहली सुरू

By admin | Published: January 10, 2017 06:35 AM2017-01-10T06:35:54+5:302017-01-10T06:35:54+5:30

‘भाजपा म्हणजे थापा’ अशी घोषणा देत आणि सत्ताधारी शिवसेनेविरूद्ध रान उठवत

MNS office bearers started the Nashik tour | मनसे पदाधिकाऱ्यांच्या नाशिक सहली सुरू

मनसे पदाधिकाऱ्यांच्या नाशिक सहली सुरू

Next

ठाणे : ‘भाजपा म्हणजे थापा’ अशी घोषणा देत आणि सत्ताधारी शिवसेनेविरूद्ध रान उठवत, नाशिकच्या कामांचे प्रेझेंटेशन दाखवत कल्याण-डोंबिवलीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदारांना घातलेली साद अपयशी ठरल्यानंतरही ठाण्यात पुन्हा नाशिकची आंबट द्राक्षे गोड करून घेण्याचा प्रयोग होणार आहे. तेथील विकासकामे सांगत ठाणेकरांपुढे मतांचा जोगवा मागण्याचे मनसेने ठरवले आहे. त्यासाठी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नाशिक सहली सुरू झाल्या आहेत.
गेल्या निवडणुकीत ठाण्यात मनसेकडे सात जागा होत्या. त्यातील काही पक्षाच्या इंजिनातून पायउतार झाले. पण या नगरसेवकांनी केलेल्या कामांच्या आधारावर पक्षाला मते मागणे शक्य नाही, हे आधीच लक्षात आल्याने पुन्हा नाशिक पॅटर्न वापरण्याचा निर्णय पक्षाने घेतला. त्यासाठी रविवारी ठाण्यातील मनसेच्या इच्छुकांना आणि पदाधिकाऱ्यांना मनसेने नाशिकच्या विकासकामांची सहल घडवली.
शिवसेना-भाजपा या सत्ताधारी पक्षांत लोकार्पण आणि श्रेयाची लढाई सुरू आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आंदोलने करून सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळे मनसेनेही आपली धुगधुगी कायम ठेवत दिव्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले आहे. तेथील डम्प्ािंगविरोधात पक्षाने आंदोलन केले खरे, पण ते त्यांच्यावरच उलटले. दिव्यात वातावरण निर्मितीसाठी दिवा महोत्सव साजरा झाला.
नाशिकप्रमाणे ठाण्याचा विकास करण्यासाठी शहर मनसेने इच्छुक आणि पदाधिकाऱ्यांसाठी नाशिक दौरा काढला. त्याला २८ बस आणि ४० चारचाकी गाड्यांचा ताफा नेण्यात आला. त्यात तब्बल १८०० हून अधिक पदाधिकारी सहभागी झाले. दिवसभर त्यांना नाशिकमधील विविध कामांची माहिती करुन देण्यात आली. त्यामध्ये बॉटनिकल गार्डन, कारंजे, चिल्ड्रन पार्क, सुशोभित चौक, विकसित रस्ते दाखवण्यात आले. ती कामे कशी केली हे सांगत ठाण्यातही असेच करू हे मतदारांना सांगायचे असे बिंबवण्यात आले. याच जोरावर आता ठाण्यातही मते मागितली जाणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: MNS office bearers started the Nashik tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.