मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये उल्हासनगरात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:52 AM2018-06-01T00:52:32+5:302018-06-01T00:52:32+5:30
पालिका मुख्यालयात गुरुवारी दुपारी मनसे पदाधिकाºयांमध्ये हाणामारी झाली. या प्रकाराने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. गेल्या महिन्यात राज यांनी पदाधिकाºयांना दिलेला कानमंत्र विसरल्याची टीका होत आहे.
उल्हासनगर : पालिका मुख्यालयात गुरुवारी दुपारी मनसे पदाधिकाºयांमध्ये हाणामारी झाली. या प्रकाराने पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. गेल्या महिन्यात राज यांनी पदाधिकाºयांना दिलेला कानमंत्र विसरल्याची टीका होत आहे.
गुरुवारी दुपारी माजी शहराध्यक्ष व उपजिल्हाध्यक्ष संजय घुगे व पक्ष पदाधिकारी सचिन बेंडके कार्यकर्त्यांसह समोरासमोर त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दरम्यान, शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी पक्षातील वाद चव्हाट्यावर आला नसल्याचे स्पष्ट केले. परस्परांतील मतभेदांमुळे दोन्ही पदाधिकाºयांच्या कार्यकर्त्यांत वाद झाल्याचे सांगितले.
उल्हासनगरात मनसे विरोधी पक्षाची भूमिका वठवत असताना पक्ष पदाधिकाºयांमधील वाद चव्हाट्यावर आला. गेल्या महिन्यात पक्षबांधणीसाठी राज यांनी उल्हासनगरमध्ये जाहीर सभा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. तसेच जुनी पक्ष कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी जाहीर केली. बंडू देशमुख यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडली असून इतर पक्ष पदाधिकाºयांची घोषणा ठाकरे यांनी केली. मात्र, जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना डावलले गेले, अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. राज यांच्या आगमनादरम्यान पक्षातील असंतोष बाहेर पडल्याने नवीन नियुक्त्यांची घोषणा करावी लागली.