कळवा रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेविरोधात मनसेचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 13:04 IST2023-08-14T13:03:52+5:302023-08-14T13:04:04+5:30
ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात एका दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राजकीय पक्ष देखील आता आक्रमक झाले आहेत.

कळवा रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेविरोधात मनसेचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळवा रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आज मनसेच्या वतीने महापालिका मुख्यालयात आयुक्त अभिजित बांगर यांच्या दालना बाहेर आंदोलन करण्यात आले.
ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात एका दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राजकीय पक्ष देखील आता आक्रमक झाले आहेत. सोमवारी मनसेच्या वतीने आयुक्तांच्या दालना बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्याच्या हाती कळवा हॉस्पिटलच्या दुरावस्थेचे फोटो हाती घेण्यात आले होते. तसेच आरोग्य व्यवस्था सक्षम करा अशी घोषणा बाजी देखील करण्यात आल्या. आयुक्तांनी समस्त ठाणेकरांची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. रोषणाई नको मोफत उपचार द्या अशी मागणीही यावेळी मनसेचे उपाध्यक्ष पुष्कराज विचारे यांनी केली.