माजीवाडा ते वडपे राष्ट्रिय मार्गावरील खड्यांविरोधात मनसेचे निदर्शनं

By अजित मांडके | Published: August 4, 2023 12:33 PM2023-08-04T12:33:45+5:302023-08-04T12:34:39+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ येथील माजीवाडा ते वडपे या २३.५ किलोमीटर आठ पदरीकरण रस्त्याच्या कामाला २०१८ ला मंजूर देण्यात आली होती.

MNS protests against stones on Majiwada to Vadape National Highway | माजीवाडा ते वडपे राष्ट्रिय मार्गावरील खड्यांविरोधात मनसेचे निदर्शनं

माजीवाडा ते वडपे राष्ट्रिय मार्गावरील खड्यांविरोधात मनसेचे निदर्शनं

googlenewsNext

ठाणे : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ येथील माजीवाडा ते वडपे या रस्त्यावर पाचशे हून अधिक खड्डे आहेत. सात दिवसांचा अल्टीमेटम देत खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वप्निल महिंद्रकर यांनी पत्रा द्वारे दिला होता. मात्र या मार्गावरील परिस्थिती जैसे थी असल्यामुळे अखेर मनसेने आंदोलनचा पवित्रा घेत खारेगाव येथे खड्यांच्या निषेधार्थ एमएसआरडीसी प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली कुंबकरान ची प्रतिमा भेट तसेच अधिकाऱ्यांना रस्त्याचे खड्डे लवकरात लवकर बुजवले नाही तर आंदोलन अजून तीव्र करण्यात येईल असे मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरेंच्या वतीने बजावण्यात आले. 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ येथील माजीवाडा ते वडपे या २३.५ किलोमीटर आठ पदरीकरण रस्त्याच्या कामाला २०१८ ला मंजूर देण्यात आली होती. मात्र गेली पाच वर्षे ह्या रस्त्याचे काम अपूर्णच असून सध्या स्थितीत  फक्त ३० टक्के काम करण्यात आले असून अजूनही दोन वर्षांचा कालावधी काम पूर्ण होण्यासाठी लागण्याची चिन्हे आहेत. तर  कामासाठी ११८२ कोटी निधी मंजूर असून कालावधी वाढल्याने प्रकल्पाचा खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. या महामार्गावर साकेत तसेच खारेगाव ह्या दोन पुलाच्या रूंदीकरणाचे काम येत असून देान्ही पुलांचे काम ५ वर्षे रखडलेले आहे. यामुळे ठाण्यातील तसेच  कळव्यातील नागरिकांनाही दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. माजीवाडा ते वडपे हा रस्ता राष्ट्रीय महामर्ग असून मुंबई, ठाणे, नाशिक, गुजरात, पनवेल आणि आग्रा, राजस्थान यांना जोडणारा महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे दिवसभरात लाखो वाहनांची वर्दळ असते.

या मार्गावर खारेगाव परिसर,मानकोली परिसर, पिपळणेर,वडपे नाका,येवलीनका ,स्वागत बार या शेत्रात मोठे खड्डे पडले असून यामुळे वाहनचालकांना तीन ते चार तासांचा अवधी केवळ वडपे ते ठाणे अंतर पार करण्यासाठी लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. या मार्गावर सुमारे ५०० हून अधिक खड्डे असून हे खड्डे बुजविण्यासाठी एमएसआरडीसी प्राधिकरण यांना   अल्टमेटम देऊन सुद्धा  ठिम्म प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून शुक्रवारी महारष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज कुंबाकरण ची प्रतिमा भेट देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.सदर आंदोलनात विद्यार्थि सेना सरचिटणीस संदीप पाचांगे, जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, उपशहर अध्यक्ष सुशांत सूर्यराव, विभाग अध्यक्ष नीलेश चव्हाण,अनिल माने,मंगेश पिंगळे,सौरभ नाईक,पवन पडवळ , दत्ता चव्हाण,मनीष सावंत ,देवेंद्र कदम व मनसैनिक उपस्थित होते.

अपघाताच्या घटना वारंवार

या रस्त्यावर अपघताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अपघात होत असून अधिकारी या प्रकल्पाकडे सर्रास दुर्लक्ष करत आहेत. तर ठेकेदारावर अद्यापही कोणतीच कारवाई केली गेली नाही.राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात एक -एक आठवडा महाप्रबंधक नसल्याची बाब ही समोर आली आहे.

वर्सोवा पूलही खड्डयात

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सहा महिन्यांपूर्वी बांधलेला वर्सोवा पूल देखील खड्ड्यात आहे. केवळ प्रकल्पाचा कालावधी वाढवून रक्कम लाटायची आणि निकृष्ट दर्जाचे काम करत नागरिकांचा बळी घेण्याची भूमिका प्रशासनाची असल्याचे दिसून येते.

समृद्धी महामार्गाला जोडणारा रस्ता

माजीवडा ते वडपे हां आठ पद्री रस्ता समृद्धी महामार्गाचा कनेक्टर असून वडपे च्या जवळ  हां रस्ता समृध्दी महामार्गाला जोडला जाणार असून या रस्त्याचे काम लवकर पूर्ण न झाल्यास त्याचा परिणाम हां ठाणे व मुंबई कडे येणाऱ्या वाहनांना भोगावा लागणार आहे.

Web Title: MNS protests against stones on Majiwada to Vadape National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.