Raj Thackeray: “ज्या मुंब्र्यात अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड निवडून येतात”: राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 10:15 PM2022-04-12T22:15:19+5:302022-04-12T22:16:15+5:30

Raj Thackeray: देशावर खरं प्रेम करणारा प्रामाणिक मुस्लिम बांधव यांच्यामुळे भरडला जातोय, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

mns raj thackeray replied ncp jitendra awhad in thane uttar sabha | Raj Thackeray: “ज्या मुंब्र्यात अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड निवडून येतात”: राज ठाकरे

Raj Thackeray: “ज्या मुंब्र्यात अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड निवडून येतात”: राज ठाकरे

Next

ठाणे: राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणावर राजकीय वर्तुळातून येणाऱ्या प्रतिक्रिया थांबत नाहीत, तोच ठाण्यात पुन्हा एकदा राज ठाकरे यांची तोफ धडाडल्याचे पाहायला मिळाले. पाडवा मेळाव्यानंतर महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांनी केलेल्या टीकेचा समाचार राज ठाकरे यांनी आपल्या उत्तरसभेत घेतला. शरद पवार यांच्यापासून ते संजय राऊतांपर्यंत अनेकांवर राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. यातच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या टीकेवर बोलताना राज ठाकरे यांनी, ज्या मुंब्र्यात अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून आव्हाड निवडून येतात, असे सांगत थेट आकडेवारीच दिली. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधत असताना राज ठाकरे यांनी आपला मोर्चा जितेंद्र आव्हाडांकडे वळवला. राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला? यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली. 

अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून आव्हाड निवडून येतात

२४ ऑगस्ट २००१ सीमीच्या ६ हस्तकांना अटक, २० डिसेंबर २००१ अबु हमजा, १६ मार्च २०२० हिजबुल मुजाहिद्दीनच्या ४ अतिरेक्यांना अटक, २३ जानेवारी २००४ एक दहशतवादी जेरबंद, २०१६ ला ताब्यात घेतलाल आयसीसचा मोरक्या, १६ मे २००३ मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी एकाला अटक, रिजवान मोबिन या संशयित अतिरेक्याला अटक, २६ जानेवारी २०१९ एका दहशतवाद्याला अटक, अशी दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या कारवाईची यादीच देत अतिरेकी सापडलेत त्याच मतदारसंघातून आव्हाड निवडून येतात, असा घणाघात राज ठाकरे यांनी केला. 

देशावर खरेच प्रेम करणारा मुसलमान भरडला जातोय

आता तुम्ही म्हणाल, वस्तरा नाही सापडला. आता कसा संन्यास घेणार? मी कुठे म्हटलो होतो की अतिरेकी सापडणार नाहीत? या अशा असंख्य घटना देशातल्या अनेक मदरशांमध्ये चाललेल्या आहेत. पाकिस्तानी अतिरेकी, शस्त्र सापडत आहेत. यात देशावर खरंच प्रेम करणारा मुसलमान भरडला जात आहे. सलीम मामा शेख याच्या मतदारसंघात ९५ टक्के हिंदू लोक राहतात. पण सलीम निवडून येतात. याचे कारण हे मराठी मुसलमान, देशावर प्रेम करणारे, प्रामाणिक राहणारे मुसलमान. देशात धर्माचा अतिरेक करणारे जे लोक आहेत, त्यांच्यामुळे हे मुसलमान भरडले जात आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. 
 

Web Title: mns raj thackeray replied ncp jitendra awhad in thane uttar sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.