ठाण्यात मनसे-शिवसेना वाद पेटला; अभिजीत पानसेंच्या आरोपावर महापौर नरेश म्हस्केंनी दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 06:50 PM2020-08-02T18:50:33+5:302020-08-02T18:51:10+5:30
अविनाश जाधव यांना अटक झाल्यावर मनसेने पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर टीका केली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये सोशल मीडियावर टीकेचे युद्ध सुरू झाले आहे
ठाणे - ठाणे महापालिकेच्या कारभाराविषयी आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अविनाश जाधव थेट आरोप करू लागल्याने शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी आमच्या कार्याचे अभिनंदन केले. अनेकांनी फोन आणि संदेश पाठविले असे मनसे नेते अभिजित पानसे यांनी सांगितल्यावर महापौर नरेश म्हस्के यांनी पानसे यांनी आपल्या मनाची स्क्रिप्ट बनवू नये असा टोला त्यांना हाणला.
अविनाश जाधव यांना अटक झाल्यावर मनसेने पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर टीका केली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये सोशल मीडियावर टीकेचे युद्ध सुरू झाले आहे. रविवारी पत्रकार परिषदेत पानसे यांनी शिवसैनिक आमच्या कार्याचे कौतुक करत असल्याचे म्हणाले. यावेळी म्हस्के यांनी पानसे हे स्क्रिप्ट रायटर आहेत त्यांनी त्यांच्या मनाची स्क्रिप्ट बनवली आहे ती त्यांच्यापर्यंत ठेवावी असा टोला लगावला आहे.
तर शिवसैनिकांचा पालकमंत्री यांच्यावर विश्वास आहे. केवळ मुलाखती देणाऱ्याकडे जाण्याची शिवसैनिकांना गरज वाटत नाही. स्वतःचा जीव धोक्यात घालून पालकमंत्री काम करत आहरे. त्यांच्या नेतृत्वाखाली आमही काम करत आहोंत. पानसे यांनी कथोकल्पित स्क्रिप्ट तयार करू नये. त्याचा आम्हा शिवसैनिकांवर परिणाम होणार नाही. माझ्या नेत्यावर कोणी आरोप करणार त्याच्या विरोधात मी जिल्हाप्रमुख म्हणून बोलणारच असेही नरेश म्हस्के म्हणाले.