अमराठी मुलांना नोकरी देणार असल्याच्या जाहिरात प्रकरणी मनसेची धडक; कंपनीने मागितली माफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 03:01 PM2021-08-03T15:01:54+5:302021-08-03T15:02:01+5:30
मनसे शहर अध्यक्ष रवी मोरे आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी धडक दिली होती.
ठाणे : वागळे ईस्टेट येथील एका कंपनीने अमराठी मुलांना नोकरी दिल्याची जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी आज मनसेने कंपनीवर धडक दिली. यावेळी संबंधीत कंपनीने त्यांची जाहीर माफी मागून मराठी मुलांनाच नोकरी देणार असल्याची कबुली दिली. यावेळी १०० टक्के मराठी मुलांची भरती झाल्यास मॅनेजरचा आम्ही बुके देऊन सत्कार करू असे मनसेने सांगितले. मनसे शहर अध्यक्ष रवी मोरे आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी धडक दिली होती.
एका खाजगी कंपनीने नोकरी संदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या जाहिरातीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य दिले जाणार नाही अशा प्रकारची माहिती मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे कळताच त्या कंपनीवर धडक देऊन तिथल्या मॅनेजमेंटला जाब विचारत देत अशा प्रकारची जाहिरात महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही या पुढे असा प्रकार घडल्यास कपंनीची एकही काच शिल्लक राहणार नाही असा दमच दिला. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत त्या कंपनीचे संचालकाने माफी मागत पुन्हा असा प्रकार कंपनीमधे घडणार नाही व मराठीच मुलांनाच प्राधान्य दिले जाईल असे पत्रकच मोरे यांना लिहुन दिले.