मनसेचे उद्या ‘चले जाव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 03:35 AM2018-07-16T03:35:32+5:302018-07-16T03:35:36+5:30
शिवसेना-भाजपाने केडीएमसीत २२ वर्षे सत्ता उपभोगूनही करदात्या नागरिकांना हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत.
कल्याण : शिवसेना-भाजपाने केडीएमसीत २२ वर्षे सत्ता उपभोगूनही करदात्या नागरिकांना हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत. त्यात आता त्यांचे बळीही जाऊ लागले आहेत. अशा निष्क्रिय ठरलेल्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेतून पायउतार व्हावे, या मागणीसाठी मनसेतर्फे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीपासून केडीएमसी मुख्यालयावर ‘चले जाव’ मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रकाश भोईर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे चौघांचा बळी गेला आहे. याप्रकरणी मनसेने सत्ताधारी शिवसेना-भाजपा आणि महापालिकेला जबाबदार धरले आहे. शिवाजी चौकातील रस्त्यावर दोन बळी गेले आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत एमएसआरडीसीचा विभाग येत असताना त्यांना रस्त्यावर उतरून केडीएमसीच्या अधिकाºयांवर आगपाखड करायला लागते, हा प्रकार म्हणजे त्यांचे सत्ताधारी निष्क्रिय ठरल्याचे सिद्ध होते, असा आरोप मनसेने यावेळी केला.
नागरिकांच्या हालअपेष्टांची जाणीव नसलेल्या तसेच बेफिकीर प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर काडीमात्र अंकुश नसणाºया सत्ताधाºयांविरोधात मंगळवारच्या आंदोलनातून ‘चले जाव’चा नारा आळवला जाणार असल्याचे भोईर यांनी सांगितले.
>प्रकल्प अर्धवट स्थितीत
गोविंदवाडी बायपास, दुर्गाडी पूल, ठाकुर्ली पूल, समांतर रस्ता, माणकोली पूल, मोहने उड्डाणपूल, आधारवाडी-गांधारी काँक्रिटीकरण रस्ता आदी प्रकल्प अर्धवट स्थितीत असल्याने कोंडी, अपघाताचे चित्र कायम आहे, असा आरोपही पदाधिकाºयांनी केला. एकही प्रकल्प मुदतीत पूर्ण झालेला नाही.