Dahi Handi : "गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे ठामपणे राहणार उभी"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 03:24 PM2021-08-23T15:24:29+5:302021-08-23T15:34:42+5:30

Dahi Handi And MNS Avinash Jadhav : महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निर्णयाला कडाडून विरोध करीत आहे. एकतर दहीहंडीसंबधात आज मुख्यमंत्र्यासमवेत पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीला विश्वविक्रम केलेल्या एकाही नामांकित गोविंदा पथकांना निमंत्रित केले गेले नव्हते.

MNS will stand firmly behind circles celebrating Dahihandi says MNS Avinash Jadhav | Dahi Handi : "गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे ठामपणे राहणार उभी"

Dahi Handi : "गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे ठामपणे राहणार उभी"

Next

ठाणे - कोरोनाच्या (Corona Virus) नावाखाली राज्य सरकारने दहीहंडीला (DahiHandi) परवानगी नाकारणे संतापजनक आहे. गणेशोत्सवाला परवानगी आणि दहीहंडीसाठी कोविडचा बाऊ हा कुठला न्याय? किमान त्यांच्या मानसिकतेचा तरी विचार सरकारने करायला हवा. तेव्हा, कितीही बंधने घातली, गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे ठामपणे उभी राहील असा थेट इशाराच मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) यांनी सरकारला दिला आहे.

राजकीय दौरे, मेळावे तसेच गर्दीतील कार्यक्रम करणाऱ्या सरकारकडून केवळ मराठी सणांवरच आक्षेप आणि निर्बंध लादले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निर्णयाला कडाडून विरोध करीत आहे. एकतर दहीहंडीसंबधात आज मुख्यमंत्र्यासमवेत पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीला विश्वविक्रम केलेल्या एकाही नामांकित गोविंदा पथकांना निमंत्रित केले गेले नव्हते. जे उपस्थित होते त्यांना तर बोलूही दिले नाही. केवळ टास्क फोर्सने आपले कोविड पालुपद सुरू ठेवल्याचा आक्षेप या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी नोंदवला आहे. याचाच अर्थ सरकारला तरुणाईच्या इच्छा आकांक्षाशी काही देणे घेणे नाही. गेली दोन वर्षे ही तरुण मंडळी दहीहंडीचा सण साजरे करू शकलेले नाहीत असे मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले.

Web Title: MNS will stand firmly behind circles celebrating Dahihandi says MNS Avinash Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.