मोदींच्या 'बुलेट'ला राज यांच्या 'इंजिना'ची टक्कर; ठाण्यात जागा मोजणीवेळी मनसैनिकांचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 01:23 PM2018-05-07T13:23:02+5:302018-05-07T13:34:51+5:30

राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक

mns workers agitation against mumbai ahmedabad bullet train in thanes shilphata | मोदींच्या 'बुलेट'ला राज यांच्या 'इंजिना'ची टक्कर; ठाण्यात जागा मोजणीवेळी मनसैनिकांचा गोंधळ

मोदींच्या 'बुलेट'ला राज यांच्या 'इंजिना'ची टक्कर; ठाण्यात जागा मोजणीवेळी मनसैनिकांचा गोंधळ

Next

ठाणे: मनसेप्रमुख राज ठाकरेंनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनविरोधात भूमिका घेतल्यावर आता मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शीळफाटा परिसरात बुलेट ट्रेनसाठी सुरू असलेली जागेची मोजणी मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडली आहे. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोजणीची मशीन फेकून दिली. पोलिसांचा बंदोबस्त झुगारुन हे आंदोलन करण्यात आलं. 

शीळफाटा परिसरातून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अनेकदा त्यांच्या भाषणांमधून बुलेट ट्रेनला विरोध केला आहे. बुलेट ट्रेनचा एकही रुळ टाकू देणार नाही, अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. त्यामुळेच बुलेट ट्रेनविरोधात आज मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शीळफाटा भागात शासनाकडून बुलेट ट्रेनच्या जागेसाठी मोजणी सुरू होती. यावेळी  जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली 100 ते 150 कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. पोलिसांचा बंदोबस्त झुगारुन या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. बुलेट ट्रेनसाठी सुरू असलेली जमीन मोजणी बंद करा, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी मनसैनिकांकडून प्रशासनाला देण्यात आला. 

Web Title: mns workers agitation against mumbai ahmedabad bullet train in thanes shilphata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.