सर्वेक्षण उधळणारे मनसैनिक कोठडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 04:53 AM2018-05-10T04:53:12+5:302018-05-10T04:53:12+5:30
सोमवारी दिवानजीक सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण उधळणाऱ्या दीडशे मनसैनिकांपैकी आठ पदाधिकाºयांना शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी ठाणे न्यालयाने त्यांना ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ठाणे : सोमवारी दिवानजीक सुरू असलेल्या बुलेट ट्रेनचे सर्वेक्षण उधळणाऱ्या दीडशे मनसैनिकांपैकी आठ पदाधिकाºयांना शीळ-डायघर पोलिसांनी मंगळवारी दुपारी ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी ठाणे न्यालयाने त्यांना ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी कामात अडथळा आणणे, बेकायदेशीर जमाव जमवणे असा गुन्हा त्यांच्यावर शीळ-डायघर पोलिसांनी दाखल केला आहे.
या कार्यकर्त्यांमध्ये ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, मनविसे ठाणे शहर अध्यक्ष संदीप पाचंगे, उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे, मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, शहर सचिव विनायक रणपिसे, प्रभाग अध्यक्ष जनार्दन खारीवले, कुशाल पाटील, उपविभाग अध्यक्ष शरद पाटील यांचा समावेश आहे. मंगळवारी शीळफाटा दत्त मंदिरात मनसे पदाधिकारी आणि शीळ व पडले गावातील बैठकीत शेतकºयांनी या सर्वेक्षणाला विरोध केला. यानंतर संबंधित अधिकाºयांना भेटून जोपर्यंत विरोध आहे तोपर्यंत सर्व्हे थांबवावे असे निवेदन अधिकाºयांना देण्यास सर्व्हे सुरू असलेल्या ठिकाणी जाताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.