अंबरनाथमध्ये मनसेच्या कामगार सेनेचे आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:44 AM2021-08-19T04:44:18+5:302021-08-19T04:44:18+5:30

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या कामगार सेनेने आमरण उपोषण सुरू केले आहे. कोविड भत्ता, ...

MNS workers fast till death in Ambernath | अंबरनाथमध्ये मनसेच्या कामगार सेनेचे आमरण उपोषण

अंबरनाथमध्ये मनसेच्या कामगार सेनेचे आमरण उपोषण

Next

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या कामगार सेनेने आमरण उपोषण सुरू केले आहे. कोविड भत्ता, सातव्या वेतन आयोगाचा फरक आणि अन्य मागण्या पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अंबरनाथ नगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचारी मिळून ७१४ जण कार्यरत आहेत. सेवानिवृत्त झालेल्यांची संख्या २५० ते ३००च्या घरात आहे. या कामगारांना सातव्या वेतन आयोगाचा फरक अजून मिळालेला नाही. सेवेची १२ आणि २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणारा भत्ता अजून मिळालेला नसून, निवृत्त कर्मचारीही या भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, तर कोविडच्या काळात घरावर अक्षरश: तुळशीपत्र ठेवून काम करणाऱ्या या कामगारांना कोविड भत्ता अजून मिळालेला नाही. अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रियाही रखडलेली आहे. या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनसे कामगार सेनेच्या माध्यमातून अनेकदा पत्रव्यवहार आणि आंदोलने करण्यात आली. मात्र, तरीही दरवेळी फक्त आश्वासनेच मिळाल्याचा आरोप कामगार सेनेचा आहे. त्यामुळेच आता अखेरचा पर्याय म्हणून कामगार सेनेने आमरण उपोषण सुरू केले आहे. मनसे कामगार सेनेच्या अंबरनाथ पालिका युनिटचे अध्यक्ष सूर्यकांत अनार्थे यांच्या नेतृत्त्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले असून, त्यात मनसेचे कार्यकर्ते आणि कामगारही सहभागी झाले. जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

----------------------------------------------

वाचली

Web Title: MNS workers fast till death in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.