भिवंडीत वाहतूक अडथळा ठरणारे बॅरिकेट मनसे कार्यकर्त्यानी आंदोलन करत हटविले
By नितीन पंडित | Published: September 22, 2022 05:51 PM2022-09-22T17:51:34+5:302022-09-22T17:52:12+5:30
भिवंडी शहरातील स्व आनंद दिघे चौक येथे उड्डाणपुला खालील रस्ता वाहतूक पोलीसांनी वाहतूक कोंडी होत असल्याने बॅरिकेट लावून बंद केला होता.
भिवंडी- भिवंडी शहरात रस्त्यावरील खड्डे व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लावलेले बॅरिकेटमुळे अधिक वाहतूक कोंडी होत असल्याने मनसे शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी झालेल्या आंदोलनात रस्त्यावर लावलेले बॅरिकेट हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे .
भिवंडी शहरातील स्व आनंद दिघे चौक येथे उड्डाणपुला खालील रस्ता वाहतूक पोलीसांनी वाहतूक कोंडी होत असल्याने बॅरिकेट लावून बंद केला होता.परंतु त्या मुळे या परीसरात सतत वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत असल्याने बॅरिकेट हटविण्याची मागणी करून ही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली शहर सचिव अजय हजारे,वाहतूक सेना संघटक फिरोज शेख,महिला सेना अध्यक्ष दीक्षिता वसईकर,रोजगार स्वयं रोजगार संघटक जय नाईक,मनीषा फर्नांडिस, कुमार पुजारी,सुनील नाईक,हरी पवार इत्यादी पदाधिकारी मनसे सैनिक यांनी रस्त्यावर उतरून येथील बॅरिकेट हटवून मार्ग मोकळा केला आहे .