मनसेच्या महामोर्चात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 02:04 AM2019-05-16T02:04:02+5:302019-05-16T02:04:18+5:30
राज्यातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मनसेच्यावतीने १७ मार्च रोजी दुपारी ठाणे महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पाच हजारावर शेतकरी सहभागी होणार आहेत.
ठाणे : राज्यातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मनसेच्यावतीने १७ मार्च रोजी दुपारी ठाणे महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पाच हजारावर शेतकरी सहभागी होणार आहेत.
आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या शेतातील भाजीपाला, फळे विकण्यासाठी १०० स्टॉल द्यावेत, आंब्याचा स्टॉल लावलेल्या शेतकºयाकडे २० हजारांची मागणाºया नगरसेविकेवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा, संबंधित शेतकºयास पालिकेने नुकसानभरपाई द्यावी या व इतर मागण्या करण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाचे आयोजक मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
आंब्याचा स्टॉल हटविण्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी रात्री मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ मध्ये हाणामारी झाली होती. यामुळे भाजप शेतकºयांच्या विरोधात असल्याचा आरोप करून आम्ही शेतकºयांच्या पाठिशी उभे आहोत यासाठी हा मोर्चा असल्याचे जाधव म्हणाले.
यात महाराष्ट्रातील पाच हजार शेतकरी सहभागी होणार असून त्यात आत्महत्त्याग्रस्त शेतकºयांची सात ते आठ कुटुंबे असणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत यांच्यासह महाराष्ट्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शिवाय अनेक पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकºयांचा आदल्या दिवशी ठाण्यात मुक्काम
मोर्चात सहभागी होता यावे करिता आदल्या दिवशी शेतकरी ठाण्यात राहायला येणार असून त्यांची निवासी व्यवस्था पक्षाच्या वतीने केली जाणार आहे. मॅटर्निटी होमची जागा संबंधित नगरसेविका हडपत होती तो प्रस्ताव आम्ही रद्द करायला लावला, याचे दु:ख म्हणून त्या नगरसेविकेने हा स्टॉल हटविला, असा आरोपही जाधव यांनी केला.
पाणीटंचाईविरोधात आंदोलन
१८ मेपासून पाणीटंचाई या विषयावर काम केले जाणार असून एक दिवस टँकर बंद आंदोलन पक्षाच्या वतीने केले जाणार आहे. टँकरमाफियांना अभय देण्यासाठी पाणी सोडले जात नाही, असा आरोप करून एक दिवस पाणी सोडले नाही, तर ठाणेकरांना पाणी मिळणार नाही का? असा प्रश्न जाधव यांनी केला.
जिल्हाधिकाºयांना
वेळ आहे कुठे ?
जिल्हाधिकाºयांना मोर्चाची दखल घेण्यासाठी वेळ नाही. मागच्या आंदोलनाचा अनुभव पाहता त्यांना दिलेल्या निवेदनाची चचार्ही करायला त्यांनी बोलवले नाही असेही जाधव म्हणाले.