मनसेचा प्रभागनिहाय वचननामा
By admin | Published: February 16, 2017 01:50 AM2017-02-16T01:50:49+5:302017-02-16T01:50:49+5:30
शहर मनसेने प्रभागनिहाय वचननामा प्रसिद्ध करून ‘स्वच्छ, सुंदर व समस्यामुक्त शहरा’ची हाक दिली आहे.
उल्हासनगर : शहर मनसेने प्रभागनिहाय वचननामा प्रसिद्ध करून ‘स्वच्छ, सुंदर व समस्यामुक्त शहरा’ची हाक दिली आहे. मनसेचे राजू पाटील, काका मांडले, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा वचननामा प्रसिद्ध केला असून प्रभागातील विविध समस्या सोडवण्यास त्यात प्राध्यान्य दिले आहे.
सत्ता मिळवण्यासाठी मनसे सक्रिय झाली असून त्यांनी या वचननाम्यात मुबलक पाणी, चकाचक रस्ते, मुलांसाठी अद्ययावत गार्डन, क्रीडासंकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, युवकांना एमपीएससी व यूपीएससी अभ्यासक्रम प्रशिक्षण, कचरामुक्त शहर, डम्पिंग ग्राउंड आदी आश्वासने दिली आहेत. पालिकेवर शिवसेना-भाजपा, साई-रिपाइंची दशकापासून सत्ता असून एकही योजना पूर्ण न झाल्याचा मनसेचा आरोप आहे.
शहराला उल्हासित करण्यासाठी मनसेने शहरासाठी वचननामा न काढता प्रभागनिहाय वचननामा प्रसिद्ध केला. यामुळे प्रभागांतील समस्या नागरिकांसमोर मांडणे सोपे होणार असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. मनसेने एकूण २२ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. (प्रतिनिधी)