मनसेची कठीण परीक्षा, तर भाजपला फुटीची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:41 AM2021-02-16T04:41:24+5:302021-02-16T04:41:24+5:30
विधानसभा निवडणुकीत जरी मनसेला बऱ्यापैकी मते मिळाली असली तरी महापालिका निवडणुकीत पक्षाला तो टक्का किती टिकविता येईल याबाबत साशंकता ...
विधानसभा निवडणुकीत जरी मनसेला बऱ्यापैकी मते मिळाली असली तरी महापालिका निवडणुकीत पक्षाला तो टक्का किती टिकविता येईल याबाबत साशंकता आहे. त्यातही आगामी काळात मनसे आणि भाजपची युती होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. युती झाली तरच ठाण्यात मनसेला पाय रोवण्यास मदत होणार आहे. परंतु तिकडे दिव्यात पक्ष या निवडणुकीत काहीतरी चमत्कार दाखवण्याची शक्यता मात्र आहे.
भाजपला पक्षफुटीची भीती
येत्या काळात भाजपचे १० ते १२ नगरसेवक फोडू असा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे असे जर झाले तर भाजपचा आकडा २३ वरून निश्चितच खाली येण्याची शक्यता आहे. त्यातही भाजपकडे आजही शिवसेनेला टक्कर देऊ शकेल असा आक्रमक चेहरा नाही. त्यामुळे भाजपला शिवसेनेचा दावा खोटा ठरवायचा असेल तर या फुटीर नगरसेवकांना शोधून त्यांचा आतापासून बंदोबस्त करावा लागणार आहे. अन्यथा, भाजपची वाट बिकट होणार आहे.