मो. ह. विद्यालयाच्या मंगला कर्वेंचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:38 AM2021-04-13T04:38:42+5:302021-04-13T04:38:42+5:30

ठाणे : मो. ह. विद्यालयाच्या माजी शिक्षिका मंगला श्रीधर कर्वे उर्फ कर्वे बाई यांचे रविवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन ...

Mo. H. Mangala Karve of Vidyalaya passed away | मो. ह. विद्यालयाच्या मंगला कर्वेंचे निधन

मो. ह. विद्यालयाच्या मंगला कर्वेंचे निधन

Next

ठाणे : मो. ह. विद्यालयाच्या माजी शिक्षिका मंगला श्रीधर कर्वे उर्फ कर्वे बाई यांचे रविवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. शाळेत त्या ३५ वर्षे सेवेत होत्या.

सतत उत्साही, आनंदी, स्पष्टवक्त्या तरीही कोणावर न रागवणाऱ्या अशी कर्वे बाईंची ओळख होती. अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी याना घडविण्यात त्यांचा वाटा होता. त्यांना संगीताचे उत्तम ज्ञान आणि सुरांची जाण होती. मो. ह. विद्यालयात त्यांनी अनेक वर्षे सांस्कृतिक विभाग सांभाळला. निवृत्तीनंतर त्यांनी निवृत्त शिक्षकांचे मंडळ स्थापन केले होते. महिन्यातील तिसऱ्या शनिवारी त्या एकत्र जमत. निवृत्त शिक्षकांचा सोहळाही त्यांनी पार पाडला होता. त्यांच्या कामाचे कौतुक एस. व्ही. कुलकर्णी, गो. ज. सामंत, नानासाहेब चितळे या मुख्याध्यापकांनी केले होते. त्यांना इतर आजारदेखील होते. त्यातच त्या कोरोनाबाधित झाल्या होत्या. अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने आजी माजी शिक्षक - शिक्षिका आणि विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Mo. H. Mangala Karve of Vidyalaya passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.