मोबाइलमध्ये तरुणीचे चित्रण करणारा गजाआड
By admin | Published: October 15, 2015 01:36 AM2015-10-15T01:36:16+5:302015-10-15T01:36:16+5:30
ठाण्यातील कोपरी भागात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिचे मोबाइलमध्ये चित्रण करणाऱ्या एका खाजगी गुप्तहेरास कोपरी पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली
ठाणे : ठाण्यातील कोपरी भागात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिचे मोबाइलमध्ये चित्रण करणाऱ्या एका खाजगी गुप्तहेरास कोपरी पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एक अनोळखी व्यक्ती काही दिवसांपासून सतत पाठलाग करीत असल्याचे या तरुणीच्या निदर्शनास आले होते. रविवारी ती ठाण्यातील एका मॉलमध्ये गेली असता ही अनोळखी व्यक्ती तिचे मोबाइलमध्ये चित्रण करीत असल्याचे तिने पाहिले. यामुळे तिने तत्काळ कोपरी पोलीस स्टेशन गाठून या घटनेची तक्र ार नोंदवली. पोलिसांनी लगेचच आपल्या तापसाची चक्रे फिरवून पाठलाग करणाऱ्या त्या व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता तो एक खाजगी गुप्तहेर असल्याची माहिती समोर आली. ऋषिकेश भालेराव असे त्याचे नाव असून तो कल्याण येथील राहणारा आहे. तो या तरु णीचा पाठलाग का व कोणाच्या संगण्यावरून करत होता, याचा तपास सुरू असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.