वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर मोबाइलचोरास अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 10:47 PM2017-08-04T22:47:03+5:302017-08-04T22:47:03+5:30

एका मोबाइलचोरीचा नौपाडा पोलिसांनी अत्यंत चिवटपणे तपास करून वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर मूळ पश्चिम बंगालचा असलेल्या चोरट्याला मुंबईच्या साकीनाका भागातून अटक केली. त्याच्याकडून चोरीतील मोबाइलही हस्तगत केला आहे.

 Mobile chase arrest after the year's follow-up | वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर मोबाइलचोरास अटक  

वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर मोबाइलचोरास अटक  

Next

ठाणे : एका मोबाइलचोरीचा नौपाडा पोलिसांनी अत्यंत चिवटपणे तपास करून वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर मूळ पश्चिम बंगालचा असलेल्या चोरट्याला मुंबईच्या साकीनाका भागातून अटक केली. त्याच्याकडून चोरीतील मोबाइलही हस्तगत केला आहे.
ठाण्याच्या वसंतविहार भागात राहणाºया संध्या पाटील या ४ आॅक्टोबर २०१६ रोजी दुपारी १.३० ते २ वाजण्याच्या सुमारास नौपाड्यातील ए.के. जोशी शाळेसमोरील एका कपड्याच्या दुकानात गेल्या होत्या. त्या वेळी कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानात शिरलेल्या एका भामट्याने त्यांचा २५ हजारांचा मोबाइल घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी पाटील यांनी १० आॅक्टोबर २०१६ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याच मोबाइलच्या तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचा मोबाइल साकीनाका येथील अलहिलाही ट्रॅव्हल्सच्या कर्मचाºयाकडे असल्याचे तपासात पोलिसांना आढळले. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय गंगावणे, शिरीष यादव, हवालदार शब्बीर फरास, सीसीटीएनएस सायबर क्राइमचे कॉन्स्टेबल गोरखनाथ राठोड आणि किशोर काळे यांच्या पथकाने वर्षभराच्या तपासानंतर महम्मद सद्दाम हुसेन (२७) याला शिताफीने १ आॅगस्ट २०१७ रोजी अटक केली. त्याच्याकडून चोरीतील मोबाइल हस्तगत केला आहे. तक्रारदार पाटील यांना हा मोबाइल मिळाल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना तो परत केला जाणार असल्याचे उपनिरीक्षक गंगावणे यांनी सांगितले.

Web Title:  Mobile chase arrest after the year's follow-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.