मोबाईल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:51+5:302021-06-16T04:52:51+5:30
--------------- दुचाकीची चोरी डोंबिवली : पूर्वेतील दावडी परिसरात राहणारे सुधाकर पालवे यांनी त्यांची दुचाकी पांडुरंगवाडी, गोळवली गाव येथील ...
---------------
दुचाकीची चोरी
डोंबिवली : पूर्वेतील दावडी परिसरात राहणारे सुधाकर पालवे यांनी त्यांची दुचाकी पांडुरंगवाडी, गोळवली गाव येथील नीता पार्किंग परिसरात उभी केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------
ट्रकचालकाला मारहाण
कल्याण : पूर्वेतील सूचकनाका आंबेडकरनगर येथे राहणारे सतीश लोंढे यांच्यावर त्याच परिसरात राहणाऱ्या रियाज, बॉस ऊर्फ आजाद आणि एका अनोळखी व्यक्तीने जुन्या पैशाच्या वादातून वस्तऱ्याने वार केल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता पिंगारा बारच्या समोर घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------------------------------
मोटारीला धडक
डोंबिवली : कल्याण-शीळ रोडवरील अंगण धाब्याच्या समोर शनिवारी दुपारी भरधाव जीपची धडक ललित जाधव यांच्या मोटारीला बसली. यात जाधव यांच्या मोटारीचे नुकसान झाले आहे. जीपचालक पसार झाला आहे. याप्रकरणी जाधव यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात जीप चालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
----------------------------------------------------
द्राक्ष खरेदीत फसवणूक
कल्याण : द्राक्ष खरेदीच्या व्यवहारात १२ लाख १२ हजार २९६ रुपयाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली वलायत ऊर्फ वल्लीभाई रहमत खान, मंगल लालचंद चौहाण याच्याविरोधात महात्मा फुले चौक पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शेतकरी संतोष जाधव यांनी तक्रार दाखल केली आहे. जाधव यांना दोन लाख रुपये देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. परंतु, १२ लाख १२ हजार २९६ रुपयांचा द्राक्षाचा माल खरेदी करून ते पैसे न देता फसवणूक झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
----------------------
कोरोनाचे नवे ८८ रुग्ण
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत सोमवारी नवीन ८८ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. रुग्णालयातील १५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार ३९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एक लाख ३४ हजार ७७८ रुग्ण आढळले आहेत, तर एक लाख ३० हजार ९१६ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
----------------------------
भंतेजींना भोजन वाटप
कल्याण : राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे कल्याण उपशहर संघटक दादासाहेब महाले यांच्यातर्फे बापगाव-देवरुग मैत्रीकूल जीवन विकास केंद्रात वृक्षारोपण, फळे व वह्या वाटप करण्यात आले. तर, कल्याण वालधुनी येथील बुद्धभूमी फाऊंडेशन येथील उपस्थित भंतेजींनाही भोजन वाटप करण्यात आले. याशिवाय कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील गरजूंसह गरिबांना अन्नदान करण्यात आले.
-------------------
पाण्याची गळती
डोंबिवली : पूर्वेतील सारस्वत कॉलनी परिसरात जलवाहिनीची गळती होत आहे. त्यामुळे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे. यामुळे रस्त्यांना खड्डे पडायलादेखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे तातडीने जलवाहिनीची दुरुस्ती करून पाण्याची गळती थांबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
-------------------