मोबाइल गहाळचे प्रमाण ४० टक्के घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 03:33 AM2018-07-01T03:33:13+5:302018-07-01T03:33:34+5:30

रेल्वेत चोरीला जाणाऱ्या मोबाइलप्रकरणी यापूर्वी गहाळ अशी नोंद केली जात होती. मात्र, त्याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होण्यास सुरुवात झाल्यावर हे प्रमाण जवळपास ४० टक्क्यांनी घटले आहे.

Mobile mounts fall by 40 percent | मोबाइल गहाळचे प्रमाण ४० टक्के घटले

मोबाइल गहाळचे प्रमाण ४० टक्के घटले

Next

- पंकज रोडेकर

ठाणे : रेल्वेत चोरीला जाणाऱ्या मोबाइलप्रकरणी यापूर्वी गहाळ अशी नोंद केली जात होती. मात्र, त्याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होण्यास सुरुवात झाल्यावर हे प्रमाण जवळपास ४० टक्क्यांनी घटले आहे. तसेच हे मोबाइलचोरटे बहुतांश अल्पवयीन आणि कर्नाटक तसेच पश्चिम बंगाल यासारख्या परराज्यांतील असल्याने त्यांना पकडणे डोकेदुखी होऊ लागली आहे.
रेल्वे प्रवासात मोबाइलचोरीप्रकरणी जून २०१७ पासून लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यास सुरुवातझाली. तत्पूर्वी मोबाइल गहाळ झाला, अशीच फक्त नोंद होत असल्याने हे प्रमाण वर्षभरात सात ते आठ हजारांच्या घरात पोहोचले होते. मात्र, गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाल्यावर जून ते डिसेंबर २०१७ मध्ये ३००२ मोबाइलचोरीचे गुन्हे दाखल झाले होते. तर, जानेवारी ते जून २०१८ मध्ये सुमारे दोन हजार मोबाइलचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यावरून, गहाळ होणाºया नोंदीपेक्षा गुन्हे दाखल होऊ लागल्याने मोबाइलचोरीचे प्रमाण ४० टक्कयांनी घटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रेल्वे प्रवासात मोबाइलचोरीचे प्रकार वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी रेकॉर्डवरील टॉप २५ ही यादी अद्ययावत केली. तसेच रेल्वेस्थानकात पेट्रोलिंगवर विशेष भर दिला आहे. या कारवाईत मोबाइलचोरटे अल्पवयीन असल्याचे समोर आले, तर काही चोरटे कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून येऊन मोबाइल फोनचोरी करून तत्काळ पोबारा करतात. तसेच चोरीला जाणाºया मोबाइलचे लोकेशन्स पाहिल्यास कर्नाटक आणि पश्चिम बंगाल असे लोकेशन्स दाखवले जाते. मात्र, दुसºयांदा त्याचे लोकेशन्स पुन्हा दिसत नाही किंवा एक किंवा दोन मोबाइल फोन आणण्यासाठी त्या ठिकाणी पोलीस फौज पाठवणेही शक्य नसल्याने त्यांना पकडणे पोलिसांसाठी डोकेदुखी होऊन बसली आहे. या चालू वर्षात जवळपास १२५ ते १५० मोबाइलचोरट्यांना पकडण्यात आले आहे. त्यातील बहुतांश चोरटे न्यायालयीन कोठडीत असल्याने हे प्रमाण ठाण्यात तरी कमी झाल्याची माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.

Web Title: Mobile mounts fall by 40 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे