काशीमीरा येथून क्रोमाच्या टेम्पोतील २१ लाख ९१ हजारांची मोबाईल व अन्य उपकरणे चोरीला
By धीरज परब | Published: April 5, 2023 03:14 PM2023-04-05T15:14:03+5:302023-04-05T15:14:54+5:30
टेम्पोच्या दाराचे लॉक तोडलेले होते आणि आतमध्ये मोबाईल आदींचे रिकामे खोके सापडले.
मीरारोड - क्रोमाचा लाखोंचा माल असून देखील त्याच्या सुरक्षिततेची काळजी न घेताच तो टेम्पोत भरून सार्वजनिक रस्त्यावर उभा केला जात होता. दरम्यान, चोरट्याने टेम्पोचे टाळे फोडून आतील मोबाईल, वीज उपकरणे आदी २१ लाख ९१ हजारांचा ऐवज चोरून नेला.
मीरारोडला राहणार अनिकेत नवनाथ पवार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. भाईंदर पश्चिम येथील क्रोमा इलेक्ट्रॉनिकचे सामान ते भिवंडी येथून आणतात आणि भाईंदर येथे पोहचवतात. टेम्पो चालक योगेश कांबळे याने भिवंडी येथून सामान आणून रात्री टेम्पो पेणकरपाडा येथील गणेश मंदिर सार्वजनिक नेहमी प्रमाणे रस्त्यावर उभा केला. सकाळी टेम्पोच्या दाराचे लॉक तोडलेले व आतमध्ये मोबाईल आदींचे रिकामे खोके सापडले.
अज्ञात चोरट्याने टेम्पोच्या दाराचे लॉक तोडुन आतील मोबाईल, वॉच, पेनड्राईव्ह, हेअर ड्रायर, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, हार्डडिस्क आदी २१ लाख ९१ हजार रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्याचे आढळून आले. पवार यांच्या फिर्यादीवरून १ एप्रिल रोजी काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम हे करत आहेत.