शेतकऱ्यांना दिली मोबाइल भात यंत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:33 PM2018-10-30T22:33:51+5:302018-10-30T22:34:46+5:30
शेतकऱ्यांनी एकत्रित शेती करा; पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिला आधुनिक शेतीचा मंत्र, ७० यंत्रांचे वाटप
जव्हार : पालघर जिल्ह्यातील अनियमित पावसामुळे उत्पादन कमी होऊन होणाºया नुकसानीवर मात करण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहे. शेतकºयांनी देखील आता पारंपरिक शेतीऐवजी एकत्र येऊन शेतीचा विकास साधणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केले. ते जव्हार येथे बोरलॉग इन्स्टिट्युट आॅफ साऊथ एशिया (बिसा) या संस्थेच्यावतीने सोमवारी जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियम येथे झालेल्या कार्यक्र मात बोलत होते.
राज्याचा आदिवासी विकास विभाग आणि बिसाच्यावतीने हवामान संपुरक आदिवासी खेडी विकास कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अंतर्गत पालघर जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ७० मोबाइल भात यंत्रांचे प्रातिनिधीक वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जव्हारचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अजित कुंभार, उप वनसंरक्षक अमित मिश्रा, बिसाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अरूण जोशी आदी उपस्थित होते.
हवामान बदलाचे मोठे दुष्परिणाम जिल्ह्याला सोसावा लागत असल्याने पारंपरिक शेतीऐवजी कृषी पूरक तंत्रज्ञान अवलंबण्याची आवश्यकता खासदार राजेंद्र गावित यांनी प्रतिपादित केली. बांधव परिस्थितीशी झगडणाºया शेतकºयाची मोबाइल भात यंत्रामुळे गावातच तांदूळ तयार करण्याची सोय होऊन त्याचा खर्च वाचणार असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या कंपन्या उत्पादनांचे ब्रॅँडींग
जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी शेतकºयांचा विकास साधण्यासाठी जिल्ह्यात साडेचार हजार शेतकरी गट तयार केले असल्याचे सांगितले. याद्वारे शेतकºयांच्या कंपन्या तयार करण्यात येणार असून विविध उत्पादनांचे ब्रँडींग केले जाणार आहे. उत्पादनांना पॅकेजिंग, ब्रँडींग आणि मार्केटिंगमुळे मागणी वाढते. जिल्ह्यात आॅरगॅनिक राईस मोठ्या प्रमाणावर आहे, त्याला योग्य भाव मिळवून देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. क्लस्टरच्या माध्यमातून मागील २-३ महिन्यात काही गावांमध्ये अडीच लाख शेवग्याची रोपे विनामूल्य वाटण्यात आली असून त्यांना मोठी मागणी येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.