डोंबिवलीत मोबाईल चोर गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:25 AM2021-07-03T04:25:01+5:302021-07-03T04:25:01+5:30
डोंबिवली : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील तिघा चोरट्यांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय अहिरे (वय ...
डोंबिवली : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील तिघा चोरट्यांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय अहिरे (वय २३), प्रथमेश गायकवाड (वय १९) आणि गणेश अहिरे (वय २० ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली, शेलार नाका परिसरातील राहणारे आहेत.
डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात ३० जूनला मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरू होता. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून गुन्हे अन्वषेण पथकाने तिघा आरोपींना अटक केली आहे. यातील अक्षय अहिरे याच्याकडून १७ हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला आहे. आणखीन सहा मोबाईल डोंबिवली भागातून चोरी केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी दिली. या तीनही आरोपींकडून अनेक मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही जॉन यांनी व्यक्त केली आहे. अक्षय अहिरे हा रामनगर पोलीस ठाणे तसेच टिळकनगर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या आरोपींना मोबाईल चोरी मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
------------------------------------------------------