ठाण्यात ज्येष्ठांसह अपंगांसाठी मोबाइल लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:38+5:302021-06-09T04:49:38+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरातील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील अपंगांसाठी ...
ठाणे : ठाणे महापालिकेने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरातील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील अपंगांसाठी कोविड-१९ मोबाइल लसीकरण सुविधेच्या माध्यमातून त्यांच्या घराजवळ लस देण्यात येणार आहे. त्यानुसार, सोमवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या शुभ हस्ते महापालिका भवन येथे या मोबाइल लसीकरण सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, परिवहन समिती सभापती विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त संदीप माळवी, परिवहन समिती सदस्या पूजा वाघ, परिवहन समिती सदस्य नितीन भोईर, वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी आदी उपस्थित होते.
या कोविड-१९ मोबाइल लसीकरण सेंटरमध्ये १ वैद्यकीय अधिकारी, १ व्हॅक्सिनेटर, १ डेटा ऑपरेटर आणि १ निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरासोबत इतर विविध ठिकाणी दररोज दुपारी १२ ते ४ या वेळेत १०० डोस देण्यात येणार असून एखाद्या नागरिकाकडे ओळखपत्र नसल्यासदेखील लस देण्यात येणार आहे. यासाठी वेळापत्रक निश्चित करून त्यानुसार दररोज लस देण्यात येणार आहे. बसमध्ये बेडची व्यवस्था केली असून ज्येष्ठांना बसमध्ये चढता येत नसल्यास खाली उतरून लस देण्यात येणार आहे.