शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 07:58 PM2022-12-30T19:58:59+5:302022-12-30T19:59:08+5:30

विधानपरिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये द्विवार्षिक निवडणूक भारत निवडणूक आयोगाने घोषित केली आहे.

Model Code of Conduct for Teacher Constituency Elections | शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू

Next

ठाणे :

विधानपरिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये द्विवार्षिक निवडणूक भारत निवडणूक आयोगाने घोषित केली आहे. यास अनुसरून ३० जानेवारीरोजी मतदान प्रक्रिया सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान पार पडणार आहे. तर २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून ४ फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानुसार कोकण विभागामध्ये निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली,असे ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील आमदार बाळाराम दत्तात्रय पाटील यांची मुदत ७ फेब्रुवारीरोजी संपत आहे. त्यामुळे २९ डिसेंबररोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया घोषित केली आहे. त्यानुसार, निवडणुकीची अधिसूचना ५जानेवारीरोजी प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी अंतिम १२ जानेवारीची मुदत आहे. १३ जानेवारीरोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून १६ जानेवारीरोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे.            

या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी पात्र शिक्षक मतदारांना नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे. विधानपरिषदेच्या मतदारसंघातील निवडणुकामध्ये पालन करावयाच्या आदर्श आचारसंहितेबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान व कोराना विषयीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश शिनगारे यांनी दिले आहे.

Web Title: Model Code of Conduct for Teacher Constituency Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.