राममंदिर कार्यक्रमापूर्वी जाणार शिवनेरीला, मोदी येणार का? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
By सदानंद नाईक | Published: January 13, 2024 05:02 PM2024-01-13T17:02:13+5:302024-01-13T17:02:45+5:30
उल्हासनगरातील प्रत्येक चौकात फटाक्यांची आतिषबाजी व स्वागत.
सदानंद नाईक, उल्हासनगर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पथकाने शहरात प्रवेश करताच प्रत्येक चौकाचौकात फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत केले. मराठा सेक्शन शाखे समोरील सभेत कल्याण लोकसभेतून निष्ठवंताला उमेदवारी देऊन गद्दाराला काढणार असल्याचे ठाकरे म्हणाले. तर रामजन्मभूमी कार्यक्रमापूर्वी शिवनेरीला जाऊन दर्शन घेणार आहे. त्यापूर्वी मोदी जातात का? हे बघावे लागेल असा टोमणा ठाकरे यांनी मोदींना लावला.
उल्हासनगरातील कैलास कॉलनी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पथकाने प्रवेश करताच शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी व जल्लोषात स्वागत केले. तसेच तेथून मोटरसायकल रैली काढण्यात आली. कैलास कॉलनी, दूधनाका, लालचक्की चौक, नेताजी चौक, व्हीनस चौक, मराठा सेक्शन, ओटी सेक्शन चौक, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे चौक, श्रीराम चौक आदी चौकात ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केले. ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी तरुण, महिला व जुन्या चेहऱ्यानी एकच गर्दी केली. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या सर्वात जुन्या व मराठा मध्यवर्ती शिवसेना शाखेला भेट देऊन जुन्या आठवणीला उजाळा दिला.
शिवसेना मध्यवर्ती मराठा सेक्शन शाखेसमोर झालेल्या सभेत हजारो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कल्याण लोकसभेत निष्ठवंतांला उमेदवारी देऊन गद्दारी घराणेशाहीला गाडून टाकणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. रामजन्मभूमीला शिवनेरीचे माती नेऊन दर्शन घेतल्यानंतर एका वर्षातच न्यायालयाने रामजन्मभूमीबाबत निकाल दिला. तर नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार असल्याचे मी जाहीर करताच पंतप्रधान मोदी यांनी मंदिराला भेट देऊन साफसफाई केली. आज जाहीर करतो की रामजन्मभूमी कार्यक्रमपूर्वी शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमी शिवनेरीचे दर्शन घेऊन येतो. पंतप्रधान मोदिंना यांची माहिती मिळाल्यावर शिवनेरीला जातात का. हे बघावे लागेल. असा टोमणा ठाकरे यांनी मोदीला लावला. तर गद्दार भाजपचे धुणीभांडी घासण्यात स्वतःला धन्यता मानत असल्याचा आरोप केला.
उद्धव ठाकरे झाले भावुक :
शहरात सर्वात जुन्या व मध्यवर्ती शिवसेना शाखेचे उदघाटन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्या मराठा सेक्शन शाखेत पाऊल ठेवताच जुन्या आठवणीला उजाळा दिला. त्यावेळी उद्धव ठाकरे भाविक झाले होते.
तरुणात उत्साह :
मराठा सेक्शन मध्यवर्ती शिवसेना शाखे समोरील प्रांगणातील सभेला तरुण, महिला व जुने शिवसैनिक भर उन्हात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ऐकायला आले होते.