"मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 03:15 PM2021-11-12T15:15:08+5:302021-11-12T15:15:25+5:30

BJP Niranjan Davkhare : भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी करात तातडीने कपात केली आहे.

Like Modi government, the alliance government should also reduce taxes on petrol and diesel says niranjan davkhare | "मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करावी"

"मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करावी"

Next

ठाणे - केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टीचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करात अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात केली आहे. 
 
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचे अनुकरण करत व्हॅट व अन्य करत कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पेट्रोल - डिझेल दरवाढीविरोधात सातत्याने आंदोलने केली होती. त्यामुळे आता केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर  आघाडी सरकारने इंधनावर लावलेले सर्व प्रकारचे कर कमी करावे, अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे. मात्र इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारला दूषणे देणाऱ्या आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी राज्य सरकारच्या करात कपात करण्यासाठी अजून हालचाली केल्याचे दिसले नाही. यावरून आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे आंदोलन हे केवळ ढोंग होते असेच सिद्ध होते. 

भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी करात तातडीने कपात केली आहे. देशातील २२ राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल डिझेलच्या दरात जनतेला आणखी  सवलत दिली आहे. महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या करात कपात करावी , असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आमदार निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात गटनेते मनोहर डुंबरे, प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक, सचिव संदिप लेले यांचा समावेश होता.

ठाण्यात १० ठिकाणी निदर्शने

पेट्रोल-डिझेलवर कर कपात करण्यास टाळाटाळ करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी १० ठिकाणी निदर्शने केली. तसेच आघाडी सरकारचा निषेध केला.
 

Web Title: Like Modi government, the alliance government should also reduce taxes on petrol and diesel says niranjan davkhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.