मोदींचे होणार भिवंडीत लॅण्डिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 07:07 AM2018-12-16T07:07:14+5:302018-12-16T07:07:30+5:30
हेलिपॅडसाठी बापसईनजीकची जागा निश्चित : सरकारी यंत्रणा अंग झाडून कामाला
कल्याण : मेट्रो रेल्वे प्रकल्प व पंतप्रधान आवास योजनेच्या घरांचे भूमिपूजन करण्यासाठी १८ डिसेंबर रोजी कल्याण दौऱ्यावर येणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिपॅडसाठी अखेर भिवंडीतील जागा निश्चित करण्यात आली आहे. कल्याण-पडघा मार्गावरील बापसई गावानजीकच्या मोकळ््या जागेत मोदींचे हेलिकॉप्टर लॅण्ड होणार असून, दौºयाच्या तयारीसाठी सरकारी यंत्रणा अंग झाडून कामाला लागली आहे.
पंतप्रधानांच्या हेलिपॅडसाठी योग्य जागा शोधताना यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. मोदींचा कार्यक्रम कल्याण पश्चिमेतील फडके मैदानावर होणार आहे. सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण करणारे मोकळे मैदान या भागात उपलब्ध नसल्याने हेलिपॅडसाठी कल्याण-पडघा मार्गावरील बापसई गावानजीकची मोकळी जागा निश्चित करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरच्या लॅण्डिंग आणि टेक आॅफमध्ये अडथळा होऊ नये, यासाठी तिथे लोंबकळणाºया विजेच्या तारा हटविण्याचे काम वीज वितरण कंपनीने केले. बापगावपासून गांधारी पुलावरुन कल्याणच्या दिशेने लालचौकीनजीक असलेल्या फडके मैदानात मोदी येणार आहेत. बापगाव हे भिवंडी तालुक्यात येते. गांधारी खाडी पुलावरुन कल्याण डोंबिवली महापालिकेची हद्द सुरु होते. महापालिकेने गांधारी ते लालचौकीपर्यंतच्या डांबरी रस्त्याची डागडुजी केली आहे. काही ठिकाणी तातडीने डांबरीकरण करुन घेण्यासही सुरुवात केली आहे. आयुक्त गोविंद बोडके यांनी शुक्रवारी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. या रस्त्यावरील गतीरोधक हटविण्याचे कामही करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या ताफ्यातील वाहनांना गतीरोधकांमुळे अडथळा होऊ नये, यासाठी गांधारी ते लाल चौकी रस्त्यावरील गतीरोधक हटवण्यात आले आहेत. या परिसरातील हातगाड्या, तसेच दुकानांसमोरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे प्रमुख सुनील जोशी यांनी सुरु केली आहे. पदपथावरील लहान मोठे १३७ गाळे तोडण्याची कारवाई केली आहे.
रस्ते चकाचक
च्कल्याण-भिवंडी बायपासवरील दुभाजक धूळ आणि वाहनांच्या धुराने काळेकुट्ट झाले होती. त्यावरील काळे पिवळे पट्टे दिसेनासे झाले असून, दुभाजकामधील झाडांभोवती कचरा साचला होता. दुभाजकाच्या बाजूने रस्त्यावर मातीचा थर साचला होता. हे दुभाजक टँकरच्या पाण्याने धुण्याचे काम शुक्रवारी दुपारी सुरु होते.
च्फडके मैदानाची क्षमता २५ हजार नागरिकांची असून, येथे दहा हजार खुर्च्या आणि त्याच्यामागे काही लोक उभे राहू शकतात. कल्याणात भाजपाचा मेळावा पार पडला. सभास्थळी ५० हजार कार्यकर्ते जमवण्याचे आवाहन यावेळी नेत्यांनी केले. मोठी गर्दी झाल्यास ती सांभाळण्याचे आव्हान सुरक्षा यंत्रणेपुढे राहणार आहे.