मोदींचा पुढचा विजय संघासाठी घातक - कुमार केतकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 03:04 AM2018-09-25T03:04:46+5:302018-09-25T03:04:51+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी घातक ठरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत संघाची मते बदलली आहेत.

 Modi's next victory is deadly for the RSS - Kumar Ketkar | मोदींचा पुढचा विजय संघासाठी घातक - कुमार केतकर

मोदींचा पुढचा विजय संघासाठी घातक - कुमार केतकर

बदलापूर  -आगामी लोकसभा निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी घातक ठरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत संघाची मते बदलली आहेत. भविष्यात नागपूरच्या रेशीमबागेचे महत्त्व कमी होण्याची भीती निर्माण झाल्यानेच संघाने आपल्या मतांमध्ये बदल केल्याचे मत खा. कुमार केतकर यांनी व्यक्त केले.
बदलापूरमधील संवेग फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ कवी राजीव जोशी लिखित ‘कापूस’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त केतकर बदलापुरात आले होते. यावेळी केतकर यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले. केतकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांत मुस्लिमांबाबत सरसंघचालकांची बदललेली मते ही मोदींमुळे बदलली असून येत्या निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी धोकादायक ठरणारा असेल, अशी भीती संघाला वाटत आहे. मोदींनंतर भाजपाचे काय होईल, मोदींनंतर संघालाही महत्त्व नसले, तर संघाचे काय होईल, अशी भीतीही संघाला वाटत आहे. त्यामुळेच काँग्रेसमधल्या हिंदुत्ववाद्यांना जवळ करण्यासाठी सरसंघचालक अशी वक्तव्ये करून वातावरणनिर्मिती करत आहेत. ही त्यांची धोरणात्मक आणि ढोंगात्मक चाल असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. येत्या निवडणुकीत मोदींना काँग्रेसपेक्षा भाजपामधूनच मोठा विरोध होणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले. केतकर यांनी मोदींच्या परदेशवारीवरही टीका केली. इतक्या दौऱ्यांनंतर काय साध्य केले, हे सांगण्याची आता वेळ आली आहे. दौºयांमुळे ना देशात परदेशी गुंतवणूक आली ना जागतिक संघटनांचे सदस्यपद मिळाले. त्यामुळे दौरे कशासाठी होते, असा प्रश्न उपस्थित होतो. जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोरांना परदेशात असलेल्या महत्त्वामुळे मोदींची महत्त्वाकांक्षा वाढली. त्यांना नेहरू-टागोरांची जागा मिळवायची आहे, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर तसे महत्त्व मिळत नसल्यानेच दौरे वाढत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. यावेळी ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, धनंजय गांगल, संदीप काळे, ग्रंथसखाचे श्याम जोशी, श्रीधर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title:  Modi's next victory is deadly for the RSS - Kumar Ketkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.