मोगरा ३०० वरून ६० रुपये किलो; शेतकरी रडकुंडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:25 AM2020-10-08T01:25:31+5:302020-10-08T01:25:34+5:30

लॉकडाऊनचा फटका; सात महिन्यांपासून भाव पडलेलेच

Mogra 300 to 60 rupees per kg | मोगरा ३०० वरून ६० रुपये किलो; शेतकरी रडकुंडीला

मोगरा ३०० वरून ६० रुपये किलो; शेतकरी रडकुंडीला

Next

- राहुल वाडेकर 

विक्रमगड : तालुक्यातून दररोज अंदाजे १२-१३ टन मोगऱ्याच्या कळ्या दादर, कल्याण, सुरत, नाशिक, पालघर मार्केटमध्ये निर्यात होत असतात. मोगºयाच्या शेतीतून वर्षाकाठी लाखोंची उलाढाल होते. मात्र, कोरोनामुळे सहा महिन्यांच्या लॉकडाऊ नकाळात फुलशेतीला मोठा फटका बसला आहे. ३०० रुपये किलोने विकला जाणारा मोगरा ६० रुपये किलोने द्यावा लागत आहे. त्यातील मोगरा काढणाºया मजुरांना ४० रुपये मजुरी द्यावी लागते. त्यामुळे मोगरा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

खांड, वाकडूपाडा, ओंदे, साखरा, सुकसाले, कुरंझे, उघाणी, उपराले, देहरजा उंबरवांगण, साखरे, पोचाडा, वाकी, कावळा अशा अनेक गावांत शेकडो आदिवासी व इतर शेतकºयांनी मोगरा लावला आहे. मोगºयाचे दररोज साधारण पाच ते १५ किलो उत्पन्न अनेकांना मिळते. त्याला प्रतिकिलो ३०० ते ५०० इतका दर मिळत होता; मात्र मार्चपासून ते आतापर्यंत सात महिन्यांपासून मोगºयाला फारशी मागणी नसल्याने मोगºयाचे भाव पडलेलेच आहेत.
मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराई संचारबंदीत सापडल्याने फुलशेतीवर कुºहाड कोसळली. ऐन हंगामात मोगºयाची मागणी ठप्प झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. श्रावण महिना आणि गणपतीमध्ये तरी भाव वाढेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती; मात्र ही आशाही फोल ठरली.
आता नवरात्र आणि दिवाळीत तरी भाव वाढतील, याकडे शेतकºयांचे डोळे लागले आहेत.

यावर्षी कोरोना संसर्गामुळे मंदिरे, बाजारपेठा, लग्नसराई, संचारबंदीत ऐन सराई निघून गेल्याने मोगरा विकता आला नाही. आता व्यापारी केवळ ६० रुपये किलोने मोगºयाला भाव देत आहेत, तर मजुरांना कळ्या काढण्यासाठी आम्हाला ४० रुपये द्यावे लागत आहेत.
- हरी तारवी, मोगरा उत्पादक शेतकरी
सध्या मोगºयाला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. आगामी नवरात्र व दिवाळीत तरी बाजारभावात वाढ होईल.
- शिवम मेहता
मोगरा उत्पादक शेतकरी

Web Title: Mogra 300 to 60 rupees per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.