मोहाची झाडे ठरताहेत ग्रामीण भागातील जनतेला फलदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 12:56 AM2021-04-05T00:56:22+5:302021-04-05T00:56:30+5:30

फळा-फुलांपासून विविध लाभ

Moha trees are becoming fruitful for the people in rural areas | मोहाची झाडे ठरताहेत ग्रामीण भागातील जनतेला फलदायी

मोहाची झाडे ठरताहेत ग्रामीण भागातील जनतेला फलदायी

googlenewsNext

राहुल वाडेकर

विक्रमगड : जि ग्रामीण भाग म्हटला की, हिरवागार मखमलींनी नटलेला परिसर. ग्रामीण भागात आंब्याच्या झाडानंतर दुसरा क्रमांक मोहाच्या झाडाचा लागतो. मोठ्या प्रमाणात असलेल्या या मोहाच्या झाडाचा गोरगरीब आदिवासी कुटुंबांना चांगला फायदा होतो. त्याच्या पालापाचोळ्याचा खत म्हणून होणारा उपयोग, त्याच्या फुलांपासून बनवल्या जाणाऱ्या गावठी दारूचा औषध म्हणून वापर, फळांची केली जाणारी भाजी, बियांपासून बनणारे खाद्यतेल असे एक ना अनेक उपयोग असल्याने ही झाडे ग्रामीण भागातील आदिवासींसाठी खऱ्या अर्थाने फलदायी ठरत आहेत.
 
विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगलात मोहाचे फलदायी वृक्ष गोरगरीब आदिवासी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहेत. बहुतांश शेतकरी, शेतमजूर हे शेतीपूरक व्यवसायावर जास्त अवलंबून असतात. शेतकऱ्याला स्वतःचे ऊन, वारा, पाऊस यापासून रक्षण करण्याकरिता मोहाचे झाड तर असतेच, त्यापासून लाकूड तर मिळतेच, पण पावसाळ्यात या झाडाची नवीन फुटलेली पालवी उन्हाच्या उष्णतेने सुकून जाते. या झाडांचा जमिनीवर पडलेला पालापाचोळा शेतीची राबणी करण्याकरिता वापरला जातो.
 
गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी रासायनिक खते परवडत नाहीत. महागाईच्या भडक्याचा विचार केला तर बाजारात खाद्यतेलाला प्रतिकिलो १३० ते १५० रुपये भावाप्रमाणे शेतकऱ्यांची वार्षिक २० ते ३० हजार रुपये बचत होत असते. तर फुलांपासून रोजगारही प्राप्त होतो.

शेतकरी खरीप हंगामाकरिता शेतीची राबणी करण्यासाठी जंगलातील पालापाचोळा गोळा करून शेतात भाजतात. त्यापासून शेतात पेरलेल्या भाताच्या रोपट्याला उपयुक्त खत मिळते.

या झाडाला पिवळ्या रंगाची फुले येतात. उष्णता फुलाला लागली की ती फुले खाली पडतात. ही फुले ग्रामीण भागात सकाळ, दुपारपर्यंतच्या वेळेत वेचून उन्हात सुकवतात. कालांतराने या फुलांना भाव मिळाला तर २० ते ३० रुपये किलोने विकली जातात. मोहाच्या झाडाला काही दिवसानंतर फळे येतात. या भागात या फळांना दोडे (मोहट्या) म्हणतात. त्या सुकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो तर पिकलेल्या दोड्यांमधून पाच ते सहा बिया मिळतात. शिवाय यातील फळांच्या टरफलांपासून शेतात खतही तयार होते. 

फुलानंतर मोहाच्या झाडाला काही दिवसांनंतर फळे येतात. काही वेळेस कोवळ्या दोड्यापासून स्वादिष्ट भाजीचे साधन म्हणून मोहट्या तयार केल्या जातात. त्या सुकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो. तर पिकलेल्या दोड्यामधून पाच ते सहा बिया मिळतात. मजूर दिवसभर २ ते ३ टोपल्या जमा करतो. त्यानंतर त्या बिया फोडल्या असता, यामधून दोन दले मिळतात. त्यास ग्रामीण भागात लोक डाळंब संबोधतात. 

Web Title: Moha trees are becoming fruitful for the people in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.