मोहम्मद पैगंबर बिल, मुस्लिम आरक्षणासाठी वंचीत बहुजन आघाडी रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 08:34 PM2021-11-22T20:34:37+5:302021-11-22T20:34:58+5:30

Thane News: राज्य शासनाने मोहम्मद पैगंबर बिल मंजूर करावे, मुस्लिम समजाला न्यायालयाने मान्यता दिलेले आरक्षण लागू करण्यासाठी वंचीत बहुजन आघाडी तर्फे आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.

Mohammed Paigambar Bill, deprived Bahujan front for Muslim reservation on the road | मोहम्मद पैगंबर बिल, मुस्लिम आरक्षणासाठी वंचीत बहुजन आघाडी रस्त्यावर

मोहम्मद पैगंबर बिल, मुस्लिम आरक्षणासाठी वंचीत बहुजन आघाडी रस्त्यावर

Next

ठाणे : राज्य शासनाने मोहम्मद पैगंबर बिल मंजूर करावे, मुस्लिम समजाला न्यायालयाने मान्यता दिलेले आरक्षण लागू करण्यासाठी वंचीत बहुजन आघाडी तर्फे आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.  ठाण्यात जिल्हाध्यक्ष सुधीर भगत यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृह जवळ पक्षाच्या वतीने धरणं आंदोलन करून आपल्या मागण्याचे निवेदन ठाण्याचे  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना देण्यात आले.

मुस्लिम समाजातील मुलामुलींकरता ५ टक्के शैक्षणिक आरक्षण देण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. पण केंद्र आणि राज्य सरकार मात्र न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास चालढकल करत आहे. मुस्लिम समाजाला फायदेशीर ठरणारे हे आरक्षण त्वरित लागू करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. याशिवाय दोन विभिन्न धर्म, जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या समाजविघातक व्यक्ती, गट यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पक्षाच्या वतीने राज्यसरकारकडे सुपूर्द केलेल्या मोह्म्मद पैगंबर बिल तातडीने लागू करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

वक्फ बोर्डाच्या जागांवर झालेले अतिक्रमणे हटवणे, वक्फ बोर्डाची मिळकत वाढवून इमाम, मुअज्जिन, खुद्दाम हजरत, हिंदू धर्मीयांतील हभप कीर्तनकाराना मासिक वेतन सुरु करणे, अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहूजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा सुनीता रणपिसे, जिल्हा महासचिव किशोर दिवेकर, ठाणे शहर उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, ठाणे शहर सचिव विनोद साबळे, अमर आठवले आणि कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Mohammed Paigambar Bill, deprived Bahujan front for Muslim reservation on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.