जयतीर्थ मेवुंडी यांच्या बंदिशीची प्रेक्षकांवर मोहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 05:35 PM2017-12-31T17:35:02+5:302017-12-31T17:35:02+5:30
श्रीकृष्णावरील विविध बंदिशी, अभंग आणि ठुमरी सादर करून सुप्रसिध्द गायक जयतीर्थ मेवुंडी यांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली.
डोंबिवली- श्रीकृष्णावरील विविध बंदिशी, अभंग आणि ठुमरी सादर करून सुप्रसिध्द गायक जयतीर्थ मेवुंडी यांनी प्रेक्षकांवर मोहिनी घातली. निमित्त होते ते श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘देवाचिया द्वारी’ या कार्यक्रमाचे.
श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या संगीत महोत्सवाचे दुसरे पुष्प सुप्रसिध्द गायक जयतीर्थ मेवुंडी यांच्या गायनाने गुंफण्यात आले. मराठी गीतांची ही मैफील आप्पा दातार चौकात काल सायंकाळी पार पडली. यावेळी संस्थानचे अच्युत कºहाडकर, प्रविण दुधे आदी मान्यवर उपस्थित होते.
मेवुंडी यांनी यमन रागाने कार्यक्रमाला सुरूवात केली. मेवुंडी यांनी स्वत:चीच ‘‘हे गोंविद गोपाल’’ ही बंदिश सादर क रून प्रेक्षकांची वाहवाह मिळविली. पंडित भीमसेन जोशीपूर्वी उस्ताद आमीर खा यांनी तराणा हा प्रकार आणला होता. परंतु त्या काळात यु टयुब नसल्याने तो प्रसिध्द होऊ शकला नाही. त्या तराणाचे कोणतेही रेकॉर्डिग नाही. भीमसेन जोशीचा तराणा मेवुंडी यांनी यावेळी सादर केला. त्याला प्रेक्षकांनी वाहवाहची दाद दिली. त्यानंतर त्यांनी केदार रागातील श्रीकृष्णाचे वर्णन करणारी ‘‘कान्हा रे नंद नंदन कान्हा’’ बंदिश सादर करून प्रेक्षकांना जिंकून घेतले. ‘‘कोण गुनने से मनाओ, पिया तो मानत नाही’’ ही ठुमरी त्यांनी सादर क रताच प्रेक्षकांनी टाळ््याच्या कडकडाटात दाद दिली. अब्दुल करीम खा यांनी कर्नाटकी स्टाईल प्रसिध्द केली. म्हैसूर खा, आमीर खा, भीमसेन जोशी, फिरोज दस्तुर,माणिक वर्मा या प्रत्येकांची एक वेगळी शैली गायनाची होती. या प्रत्येकांनी गायिलेली ‘‘जय जय रामकृष्ण हरी’’ ही ठुमरी मेवुंडी यांनी सादर केली. या ठुमरीने प्रेक्षकांची वन्स मोअरची दाद मिळविली. त्यानंतर त्यांनी ‘‘लागली समाधी, समाधी ज्ञानेशाची, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी’’ हा अभंग सादर केला.
मेवुंडी यांना व्यंक टेश कुलकर्णी, आदिती कºहाडे यांनी साथ संगत केली.
फोटो आनंद मोरे
----------------------------------------------------------------