मोखाडा तालुका आजही समस्यांनी ग्रस्त

By admin | Published: October 5, 2016 02:14 AM2016-10-05T02:14:38+5:302016-10-05T02:14:38+5:30

शासनपातळीवर कितीही विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या तरी आदिवासीच्या नशिबाचा वनवास स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही संपलेला नाही हे कुपोषण बळींनी सिद्ध केले आहे.

Mokhada taluka suffers with problems today | मोखाडा तालुका आजही समस्यांनी ग्रस्त

मोखाडा तालुका आजही समस्यांनी ग्रस्त

Next

रविंद्र साळवे,  मोखाडा
शासनपातळीवर कितीही विकासाच्या गप्पा मारल्या गेल्या तरी आदिवासीच्या नशिबाचा वनवास स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही संपलेला नाही हे कुपोषण बळींनी सिद्ध केले आहे.
येथील आरोग्य, रोजगार, शिक्षण, पाणी, वीज, इत्यादी मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला असल्याने इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी येथील भूमिपुत्र वर्षनुवर्षे स्थलांतरित होत असून कुपोषणबळीच्या एका मागोमाग अनेक घटना घडल्याने कुपोषण निर्मूलनाचा दावा करणाऱ्या प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. कुपोषणाचे प्रमुख कारण रोजगाराचा अभाव असल्याने स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचं आहे परंतु तालुक्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या उदासीनतेमुळे कायम स्वरूपी रोजगार देणारी कसलीच यंत्रणा येथे उपलब्ध नाही केलेल्या कामाचा मोबदला वर्षवर्ष होऊनही मिळत नाही यामुळे आदिवासी बांधवांसह सुशिक्षित तरुण स्थलांतरित होत आहे. तालुक्यातील बिवलपाडा रुईपाडा फनसपाडा कुर्लोद अशा विविध गावपाड्यांना अजूनपर्यंत शासनाच्या कोणत्याच सोईसुविधा पोहचलेल्या नसून काही गावपाड्यांना विजेचा प्रकाश बघायला सुद्धा मिळालेला नाही तर शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा करणारे विजेचे खांब जीर्ण झाले असल्याने विज सेवेचा नेहमीच लपंडाव असून भारनियमन व विजेचा लपंडाव यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे.
येथे रयतचे महाविद्यालाय आणि खोडाळ्याचे मोहिते कॉलेज सोडले तर इतर शिक्षणाची कोणतीच सोय नाही. यामुळे येथील आदिवासी मुलांना नाशिक वसई, पुणे, मुंबई, ठाणे येथे शिकायला जावे लागते. (वार्ताहर)

Web Title: Mokhada taluka suffers with problems today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.