डोंबिवलीत मृत्यूनंतरही रुग्णांची अंत्यसंस्कारांकरिता परवड, ज्येष्ठ पत्रकाराच्या अंत्यसंस्कारांसाठी हेलपाटे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 01:23 AM2020-07-09T01:23:02+5:302020-07-09T01:26:16+5:30

कोरोना रुग्णांचे स्वॅब रिपोर्ट वेळेवर न मिळाल्याने, रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने, रुग्णालयात बेड न मिळाल्याने, व्हेंटिलेटरची कमतरता असल्याने प्रचंड हाल होत असल्याच्या अनेक कहाण्या कानावर येत आहेत. परंतु मृत्यूनंतर स्मशानभूमी उपलब्ध न झाल्यानेही परवड होत आहे.

molestation for funeral of senior journalist | डोंबिवलीत मृत्यूनंतरही रुग्णांची अंत्यसंस्कारांकरिता परवड, ज्येष्ठ पत्रकाराच्या अंत्यसंस्कारांसाठी हेलपाटे

डोंबिवलीत मृत्यूनंतरही रुग्णांची अंत्यसंस्कारांकरिता परवड, ज्येष्ठ पत्रकाराच्या अंत्यसंस्कारांसाठी हेलपाटे

Next

- अनिकेत घमंडी
डोंबिवली : कोरोना रुग्णांचे स्वॅब रिपोर्ट वेळेवर न मिळाल्याने, रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने, रुग्णालयात बेड न मिळाल्याने, व्हेंटिलेटरची कमतरता असल्याने प्रचंड हाल होत असल्याच्या अनेक कहाण्या कानावर येत आहेत. परंतु मृत्यूनंतर स्मशानभूमी उपलब्ध न झाल्यानेही परवड होत आहे.
डोंबिवलीतील ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे यांचे मंगळवारी रात्री अकस्मात निधन झाले. त्यांना श्वसनाचा त्रास झाल्यानंतर वेळेवर आॅक्सिजन मिळाला नाही, तसेच वेळेत उपचारासाठी रुग्णवाहिका आली नाही. अखेर त्यादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे शास्त्रीनगर रुग्णालयाने घोषित केले. परंतु, त्यानंतर शहरातील पाथर्ली, शिवमंदिर येथील वैकुंठ स्मशानभूमीत गॅसदाहिनी बंद असल्याने त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी कल्याणपर्यंत न्यावे लागले. मृत्यूनंतर तब्बल तीन तास अंत्यसंस्कारांसाठी काटदरे यांचे शव रखडले. २२ हून अधिक वर्षे शिवसेना, भाजपने सत्ता उपभोगून शहरांमध्ये अद्ययावत स्मशानभूमी उभी न केल्याबद्दल सोशल मीडियात नागरिकांकडून तीव्र नापसंती व्यक्त केली गेली.

शहरातील गॅसदाहिन्यांची सुविधा असलेल्या स्मशानभूमी बंद असल्याची माहिती शास्त्रीनगर रुग्णालयात रात्री १०.३० च्या सुमारास सांगण्यात आली. त्यानंतर कल्याणमध्ये बैलबाजार येथे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला असता, तेथे वेटिंगवर असल्याचे सांगण्यात आले. अखेरीस सव्वातास वाट पाहण्यापेक्षा लालचौकी येथे अंत्यसंस्कार करण्याकरिता मध्यरात्री पार्थिव नेण्यात आले. परंतु, ती स्मशानभूमी बंद होती. काही वेळाने गॅस दाहिनीचे कार्य करणारा कामगार तेथे आला, परंतु मृतदेहाला हात लावणार नाही, या अटीवर तो अंत्यसंस्कारास तयार झाला. त्याने दिवसभरात आठ जणांवर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले. त्या कामगाराला संरक्षक किट, हॅण्डग्लोज देण्यात आले नव्हते, साधा मास्कही देण्यात आला नव्हता, हीच स्थिती तीन महिन्यांपासून असल्याचे त्याने सांगितले. बैल बाजारमधील स्मशानभूमीमध्ये कामगारांनी सांगितले की, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, गॅसदाहिनीत विद्युत दिव्याची व्यवस्था नाही.

डोंबिवलीतील पाथर्ली येथील गॅसदाहिनीत काम करणाऱ्या कामगाराचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या ठिकाणी ठाणे येथून कामगार येत आहे. मंगळवारी रात्री ती बंद ठेवण्यात आली होती. शिवमंदिर येथील गॅसदाहिनी दिवसभरात क्षमतेपेक्षा जास्त अंत्यसंस्कार केल्याने बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे काटदरे यांचा मृतदेह कल्याण येथे अंत्यसंस्कारांसाठी न्यावा लागला.

विशेष स्मशानभूमी राखीव ठेवा : डोंबिवली, कल्याणमध्ये गॅसदाहिन्यांची देखभाल होत नसल्याने त्यांची क्षमता संपुष्टात आली असून लाकडावर कोविड संशयित, कोविड रुग्णांना अंत्यसंस्कारांची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आयुक्तांकडे विचाराधीन असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. टिटवाळा, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी महापालिकेने कोविड अंत्यसंस्कारांसाठी विशेष स्मशानभूमी राखीव ठेवून तेथे २४ तास कर्मचारी कार्यरत ठेवायला हवेत, अशी मागणी केली आहे.

Web Title: molestation for funeral of senior journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.