ठाण्यात विवाहितेचा घरापर्यंत पाठलाग करुन विनयभंग: प्रतिकारानंतर आरोपीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 08:07 PM2018-03-05T20:07:11+5:302018-03-05T20:07:11+5:30

ठाण्याच्या पााचपाखाडीमध्ये राहणा-या एका विवाहितेचा पाठलाग करुन थेट घरात शिरुन विनयभंग करुन एका माथेफिरुने पलायन केल्याची घटना रविवारी घडली.

Molestation of housewife at Thane,: The escape of the accused after the retaliation | ठाण्यात विवाहितेचा घरापर्यंत पाठलाग करुन विनयभंग: प्रतिकारानंतर आरोपीचे पलायन

प्रतिकारानंतर आरोपीचे पलायन

Next
ठळक मुद्देपूर्वीची ओळख सांगून घरात शिरकावमहिलेने प्रतिकार करुन घेतला चावानौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार

ठाणे: जुजबी जुनी ओळख काढून पाचपाखाडीतील एका चाळीत शिरुन एका २० वर्षीय विवाहितेचा विनयभंग करणा-या रॉबर्ट मढवी याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या महिलेने त्याला प्रतिकार करतांनाच त्याच्या हाताला जोरदार चावा घेतल्याने त्याने पलायन केले असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पाचपाखाडीतील एका चाळीत राहणारी ही विवाहिता वीजेचे बिल भरण्यासाठी १६ फेब्रुवारी २०१८ रोजी यशवंत टॉवर येथे जात असतांना त्यांच्याशी जुजबी ओळख असलेला रॉबर्ट मढवी याने त्यांचा चोरुन पाठलाग केला. नंतर त्याने त्यांना जबरदस्तीने त्याच्या दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्यांनी दुर्लक्ष केल्यानंतर त्याने पुन्हा ४ मार्च २०१८ रोजी एका महिलेसोबत त्यांच्या घरी येऊन त्याची ओळख सांगितली. त्यानंतर तो निघून गेला. अर्ध्या तासाने त्या महिलेचा पती बाहेर गेल्यानंतर मात्र त्याने पुन्हा त्यांच्या घरात शिरकाव करुन तिचे तोंड दाबून तिचा विनयभंग केला. अचानक झालेल्या या प्रकाराला तिने त्याला प्रतिकार करीत त्याच्या हाताला जोरदार चावा घेऊन त्याला ढकलून दिले. त्यानंतर मत्र त्याने तिथून पलायन केले. याप्रकरणी तिने नौपाडा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केली आहे. राबोडी परिसरात राहणारा रॉबर्टला गांजाचे व्यसन असून त्याने यापूर्वीही दोन तीन वेळा अशाच प्रकारे विवाहित महिलांचा विनयभंग केला आहे. मात्र भीतीपोटी कोणीही तक्रारीसाठी पुढे आले नाही. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Molestation of housewife at Thane,: The escape of the accused after the retaliation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.