आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

By admin | Published: April 10, 2017 04:18 AM2017-04-10T04:18:19+5:302017-04-10T04:18:19+5:30

आइस्क्रीमचे आमिष दाखवून दोन रिक्षाचालकांनी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी

Molestation of two minor girls by showing bait | आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

Next

ठाणे : आइस्क्रीमचे आमिष दाखवून दोन रिक्षाचालकांनी दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी रात्री वागळे इस्टेट भागात घडली.
वागळे इस्टेट भागातील ९ वर्षांची मुलगी शुक्रवारी रात्री घराजवळील साईकृपा हॉस्पिटलनजीक तिच्या ५ वर्षांच्या मैत्रिणीसोबत खेळत होती. याच भागात राहणारे श्याम चौहान (वय ३६) आणि प्रदीप गायकवाड (वय २८) यांनी दोन्ही मुलींना आइस्क्रीमचे आमिष दाखवून रिक्षात बसण्यास सांगितले. श्याम चौहान हे शेजारीच राहात असल्याने मुली त्यांच्यासोबत रिक्षात बसल्या. त्यानंतर, आरोपींनी एम्को कंपनीच्या दिशेने रिक्षा नेऊन मुलींना आइस्क्रीम खायला दिले. आइस्क्रीम खाताना आरोपींनी मुलींचा विनयभंग केला. हा प्रकार घरी कुणालाही न सांगण्याची धमकीही त्यांनी दिली. दोन्ही आरोपी रिक्षाचालक असून, त्यांना अटक केली असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Molestation of two minor girls by showing bait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.