जिल्हा रुग्णालयात महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 06:31 AM2018-06-15T06:31:16+5:302018-06-15T06:31:16+5:30

ठाणे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील सफाई कामगाराने भिवंडीतील महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

Molestation of woman in district hospital | जिल्हा रुग्णालयात महिलेचा विनयभंग

जिल्हा रुग्णालयात महिलेचा विनयभंग

Next

ठाणे : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील सफाई कामगाराने भिवंडीतील महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी आरोपीला गुरुवारी पहाटे ठाणेनगर पोलिसांनी अटक केली. मागील तीनचार महिन्यांत रुग्णालयाच्या आवारात घडलेली ही तिसरी घटना आहे. दोन घटनांत, त्या रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांकडून हे प्रकार घडल्याने रुग्णालयात येणाºया महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या नेत्रालय रुग्णालयाच्या इमारतीच्या दुसºया मजल्यावर कुपोषित बालक पुनर्वसन केंद्र आहे. त्या केंद्रात भिवंडीतील तीसवर्षीय महिलेच्या दोन मुलांना (मुलगा-मुली) उपचारार्थ ५ जून रोजी दाखल केले आहे. बुधवारी सायंकाळी त्या पीडित महिलेची मुलगी रडत असल्याने ती त्या मुलीला घेऊन केंद्राच्या आवारात फिरत होती. याचदरम्यान, तेथे ड्युटीवरील सफाई कामगार मनोज मनपे (३५ रा. चिरागनगर, ठाणे) याने महिलेचा विनयभंग केला. महिलेने ठाणेनगर पोलिसांत तक्रार केल्यावर मध्यरात्री गुन्हा दाखल करून मनोजला गुरुवारी पहाटे अटक केली. त्याला ठाणे न्यायालयात हजर केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी दिली.
पोलीस व्हॅन हलवली
एप्रिल महिन्यात रुग्णालयात रात्री झोपी गेलेल्या एका चोवीसवर्षीय तरुणीचा अनोळखी तरुणाने विनयभंग केला होता. त्यानंतर, सुरक्षेसाठी ठाणेनगर पोलिसांनी पोलीस व्हॅन तैनात केली होती. मात्र, ती व्हॅन १५ दिवसांपूर्वीच हलवल्यानंतर पुन्हा रुग्णालयात विनयभंगाचा प्रकार घडला आहे.

Web Title: Molestation of woman in district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.