पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 12:43 AM2019-09-01T00:43:47+5:302019-09-01T00:45:07+5:30

केंद्र सरकारला अहवाल देणार। शुक्रवारी अडकले होते वाहतूककोंडीत

Monitoring of crop loss by the Central Squad | पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Next

ठाणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पाच हजार ८८७ हेक्टरवरील पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या वस्तुस्थितीची दोनदिवसीय पाहणी केंद्रीय पथकाने शनिवारी ठिकठिकाणी जाऊन केली. शनिवारी पाऊस असतानाही छत्र्यांच्या मदतीने पथकातील अधिकाऱ्यांनी पीक व जमीन नुकसानीची पाहणी केली. याचा अहवाल ते केंद्र शासनाला देणार आहेत.

केंद्र शासनाच्या या पीक नुकसान पाहणी पथकाकडून शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील भातपिकासह शेतजमिनीच्या नुकसानीची पाहणी केली. शुक्रवारी रायगडहून येताना या पथकास वाहतूककोंडीचा फटका बसला. पेणजवळील हमरापूर परिसरात वाहतूककोंडीत अडकले होते. तरी, शुक्रवारी संध्याकाळी बारवी येथील विश्रामगृहात गेल्यानंतर पीकपाहणीचे पे्रझेंटेशन जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देऊन शनिवारी सकाळीच नियोजनानुसार अंबरनाथ तालुक्यातील कसगाव येथील पीकनुकसानीची पाहणी केली. याशिवाय, बदलापूरजवळील हेंदरेपाडा, रमेशनगर येथील नुकसानग्रस्त घरांची पाहणी या अधिकाºयांनी केली.
कल्याण तालुक्यातील आणे, वासुंद्री, कोंढेरी येथील भातपिकांच्या नुकसानीची पाहणी या केंद्रीय पथकाने केली. यामध्ये केंद्राच्या इलेक्ट्रिकल अ‍ॅथॉरिटीचे सहसंचालक ओम किशोर यांच्यासह केंद्रीय पाणीआयोगाचे संचालक मिलिंद पानपाटील, केंद्राच्या रस्ते वाहतूक महामार्गाचे अधीक्षक अभियंता संजय जैस्वाल, पीएफसीचे संचालक चित्तरंजन दास आदी केंद्रीय पथकातील अधिकाºयांसह ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी उपसंचालक सावंत, तालुका कृषी अधिकारी शिल्पा निखाडे, संजय पायस, रामचंद्र घुडे आदी अधिकारी या पीक, शेतजमीन नुकसान पाहणी पथकात सामाविष्ट होते.
या पथकाने जिल्ह्यातील पाच हजार ८०० हेक्टर पिकांची, तर ८७ हेक्टर शेतजमिनीच्या नुकसानीचीदेखील वस्तुस्थितीची पाहणी या पथकाने केली. या पाहणी दौºयात कल्याण तालुक्यात वसात-शेलवली येथील पीक नुकसानीच्या पाहणीसह आणे व भिसोळ येथील घरांच्या आणि पिकांच्या नुकसानीच्या पाहणीचे नियोजन केले होते. त्याुनसार, या पथकाने पाहणी केली. यामध्ये कल्याण तालुक्यातील वसुंद्री व सांगोडे येथील पीक नुकसानीची पाहणी या दौºयात करण्यात आली.

१०,२७५ मालमत्तांचे नुकसान
गेल्या महिन्यातील २६ व २७ जुलै या दोन दिवसांसह ४ आॅगस्टच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नदीनाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले.

यामुळे १० हजार २७५ खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तर, एक हजार ५१८ घरांची पूर्णत: तर काहींची अंशत: पडझड झाली. जिल्हाभरात तब्बल २७ जणांचा या पूरआपत्तीत मृत्यू झाला. या अतिवृष्टीमुळे सहा हजार १०० कुटुंबांना व ५०० व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात निराधार व्हावे लागले होते.

एवढेच नव्हे तर गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यासारखी १०४ जनावरे पुराच्या पाण्यात दगावली आहेत. सुमारे पाच हजार ८८७ हेक्टरवरील भातपीक नष्ट झाले आहे. याशिवाय, ८७ हेक्टरवरील शेतजमीन या पूरस्थितीत नापीक झाल्याचे शेतकºयांकडून ऐकायला मिळत आहे.
 

Web Title: Monitoring of crop loss by the Central Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.