शॉक लागून माकडाचा मृत्यू; वागळे इस्टेटमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 23:26 IST2021-07-23T23:25:45+5:302021-07-23T23:26:03+5:30
घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

शॉक लागून माकडाचा मृत्यू; वागळे इस्टेटमधील घटना
ठाणे : येथील वागळे इस्टेट, रामनगरमधील हनुमान मंदिराजवळच शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका माकडाला महावितरणच्या इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृत माकडाला इलेक्ट्रीक वायरवरून खाली काढून वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.