संक्रमण शिबिरातील माकडास जंगलात सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:52+5:302021-05-31T04:28:52+5:30

मीरा रोड : गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर संक्रमण शिबिरातील काही रहिवाशांना चावणाऱ्या एका माकडास वनविभागाने पकडून संजय गांधी ...

The monkeys in the transition camp were released into the wild | संक्रमण शिबिरातील माकडास जंगलात सोडले

संक्रमण शिबिरातील माकडास जंगलात सोडले

Next

मीरा रोड : गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर संक्रमण शिबिरातील काही रहिवाशांना चावणाऱ्या एका माकडास वनविभागाने पकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले. माकडाच्या काहीजण खोड्या काढत असल्याने ते काहींचा चावा घेत होते.

घोडबंदर संक्रमण शिबिराजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागात एका माकडाचा वावर होता. माकडास रहिवासी खाद्यपदार्थ देत असत. काहींच्या तर माकड घरात जाऊन खात असे. त्याच्याकडून कोणाला काही इजा वा त्रास नसला तरी काही उनाड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या माकडास दगड मारणे, त्रास देणे आदी प्रकार सुरू केले. त्यामुळे माकडाने काहींना चावे घेण्याचे प्रकार सुरू झाले.

या प्रकाराबाबत मनसेच्या कल्पना साळुंखे यांच्याकडे तक्रारी आल्या असता त्यांनी सचिन जांभळे यांना कळवले. जांभळे यांनी वनविभागाच्या येऊर येथील अधिकारी राजेंद्र पवार यांना निवेदन केले व माकडास पकडून जंगलात सोडण्याची विनंती केली. घोडबंदर वनअधिकारी मनोज पाटील यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पथकासह माकडास पकडण्यासाठी पिंजरा लावला. अखेर शनिवारी माकडाला पकडण्यात यश आले. नंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेऊन सोडले.

Web Title: The monkeys in the transition camp were released into the wild

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.