मॅरेथॉनमध्ये मोरगा,उगले विजयी

By admin | Published: September 26, 2016 01:53 AM2016-09-26T01:53:40+5:302016-09-26T01:53:40+5:30

या तालुक्यातील माकुणसार येथे रविवारी सकाळी झालेली मॅरेथॉन ज्ञानेश्वर मोरगा व दिव्या उगले यांनी जिंकली. स्पोर्टक्लबच्यावतीने तिचे आयोजन केले गेले होते.

Moraga, the weights in the marathon | मॅरेथॉनमध्ये मोरगा,उगले विजयी

मॅरेथॉनमध्ये मोरगा,उगले विजयी

Next

पालघर : या तालुक्यातील माकुणसार येथे रविवारी सकाळी झालेली मॅरेथॉन ज्ञानेश्वर मोरगा व दिव्या उगले यांनी जिंकली. स्पोर्टक्लबच्यावतीने तिचे आयोजन केले गेले होते. सकाळी ८ वाजता सुरु झालेली ही स्पर्धा ११ किमी अंतराची होती. जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने तिच्यात सहभाग घेतला, पावसाने हजेरी लावली तरी त्याचा कोणताही परिणाम स्पर्धकांच्या उत्साहावर झाला नाही.
मुख्य मिनी मॅरेथॉन, वरिष्ठ नागरिक आणि महिलांसाठी अशा विविध गटात ही स्पर्धा घेण्यात आली. ११ किमीचे अंतर ज्ञानेश्वर विठ्ठल मोरगा रा. विक्र मगड यांनी ३७ मि. ३७ सेकंदात पूर्ण करून प्रथम क्र मांक पटकावला. महिला गटामध्ये दिव्या सुरेश उगले रा. सायवन हिने ५३ मि.०७ सेकंदात पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत अनंत सदाशिव म्हात्रे रा. माकुणसार हे प्रथम आले. स्पर्धेच्या बक्षिस वितरण सभारंभाला पालघर जिल्हा अ‍ॅथलेटिक असोशिएशनचे अध्यक्ष आणि आमदार क्षितिज ठाकुर प्रमुख पाहुणे म्हणून उपास्थित होते, तसेच बोईसरचे आमदार विलास तरे, पालघर विधानसभा आमदार अमित घोडा, उपजिल्हाप्रमुख आणि माजी पं. समिती सदस्य वसंत चव्हाण, यंग स्टार सफाळेचे अध्यक्ष राजेश म्हात्रे, विक्रमगड कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष नीलेश सांबरे आणि पालघर विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक निमित गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार क्षितिज ठाकूर यांनी स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेणाऱ्या स्पोर्ट्स क्लबच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले, तसेच जास्तीत जास्त तरु ण तरु णींनी खेळामध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले आणि यशस्वी स्पर्धकांना बक्षिस वितरित करून त्यांचे अभिनंदन केले. कार्यकर्माचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Moraga, the weights in the marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.