विविध मागण्यांसाठी श्रमजीवी संघटनेचा केडीएमसीवर बिऱ्हाड मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 04:00 PM2018-12-24T16:00:09+5:302018-12-24T16:00:18+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघनटेच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या विरोधात बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला.
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील आदिवासीपाड्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघनटेच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या विरोधात बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी आदिवासी बांधवांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंबडेकर उद्यानापासून काढण्यात आलेल्या बिऱ्हाड मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाले शहरी लोकवस्ती वाढत आहे. महापालिकेच्या स्थापनेच्या आधीपासून महापालिका हद्दीत 25 आदिवासी पाडे आहे.
या आदिवासीपाड्यांना महापालिकेच्या वतीने मूलभूत सोयी-सुविधा पुरविल्या जात नाहीत. कायदा करून देखील आदिवासी पाड्यातील मुलाना शिक्षणाची सोय नाही. अनेक बिल्डरांनी आदिवासी बांधवांच्या जागेवर कब्जा करून त्यांना त्या ठिकाणाहून हुसकावून लावले आहे. महापालिका त्याची दखल घेत नाही. त्यामुळे आदिवासी बांधव रस्त्यावर आले आहेत. आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या विविध मागण्यासाठी मोर्चातील शिष्टमंडळाने आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली.
आयुक्तांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे की, येत्या पंधरा दिवसा सर्व आदिवासीपाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले. पंधरा दिवसात आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन समस्या सोडविण्यास दिरंगाई केल्यास आदिवासी बांधव पुढच्या वेळी आक्रमक होतील, असा इशारा बाळाराम भोईर यांनी दिली आहे.