ठाण्यातील गणपती मिरवणुकांमध्ये 110 डिसिबलपेक्षा जास्त आवाजाची पातळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 05:37 PM2017-09-06T17:37:01+5:302017-09-06T17:37:12+5:30
अनंत चतुर्दशी विसर्जनाच्या वेळी आवाजाने गाठली 110 डेसिबलच्या पुढची अत्युच्च पातळी ( hmm) गाठली. यामध्ये विष्णुनगर, खोपट, सिव्हील इस्पितळ आणि कळवा नाका येथे जवळपास अडीच तास शंभर डेसिबल पातळी होती.
ठाणे, दि. 6 - अनंत चतुर्दशी विसर्जनाच्या वेळी आवाजाने गाठली 110 डेसिबलच्या पुढची अत्युच्च पातळी ( hmm) गाठली. यामध्ये विष्णुनगर, खोपट, सिव्हील इस्पितळ आणि कळवा नाका येथे जवळपास अडीच तास शंभर डेसिबल पातळी होती. याप्रमाणेच ठाणे शहर, कोपरी, चरई, खोपट, कोलबाड, कॅस्टल मिल नाका आणि कळवा नाका येथून 40 तक्रारी दाखल, केवळ एकाच ठिकाणी कारवाई केली, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे पोलीस हतबल दिसल्याचे ठाणे मतदार जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
सिव्हील हॉस्पिटलच्या परिसरात कळवा नाका येथून अनुप प्रजापती व मिलिंद महाजन या कार्यकर्त्यांनी 18 तक्रारी दाखल केल्या. खोपट येथील सहील हॉस्पिटल, लाइफलाइन हॉस्पिटल येथे तीन मिरवणुकांनी डॉल्बी व फटाके यामुळे अडीच तास अत्युच्च ध्वनिप्रदूषण, रुग्णांचे नातेवाईक बेजार, रस्त्याच्या एका बाजूला नौपाडा पोलिसांनी डॉल्बी जप्त केला (त्या मंडळाने नंतर बँजोची व्यवस्था केली. त्यानं देखील 100 डेसिबल आवाज केला) तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला राबोडी पोलिस तक्रारी करून देखील फिरकले नसल्याचा अनुभव आला आहे.
या मोहिमेत मंगेश खातू, रोहित जोशी, राजीव दत्ता, सुब्रतो भट्टाचार्य, अनुप प्रजापती, श्वेता चटर्जी, मिलिंद महाजन यांनी खूप मेहनत घेऊन 40 पुरावे गोळा केले, ठाणेकर्स या संस्थेच्या युवा कार्यकर्त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली.