मंगळवारपासून धावणार जादा लोकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 06:23 AM2018-01-28T06:23:30+5:302018-01-28T06:23:41+5:30
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर कल्याणच्या दिशेकडील नवीन पादचारी पुलाचा तसेच ठाणे पूर्वेस चढणा-या व उतरणा-या अशा दोन्ही सरकत्या जिन्यांचा लोकार्पण सोहळा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.
ठाणे - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर कल्याणच्या दिशेकडील नवीन पादचारी पुलाचा तसेच ठाणे पूर्वेस चढणा-या व उतरणा-या अशा दोन्ही सरकत्या जिन्यांचा लोकार्पण सोहळा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. याचदरम्यान, ठाणे ते वाशी-पनवेल या वाढीव फेºयांचा शुभारंभ केला असून या फेºया येत्या ३० जानेवारीपासून सुरू होणार आहेत. याप्रसंगी ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, सुरेश व्ही. नायर, स्टेशनमास्तर एस.बी. महिदर आदी उपस्थित होते.
ठाणे रेल्वे स्थानकातून सुटणा-या गाड्या
लोकल वेळ
ठाणे ते पनवेल सकाळी ९:१४
ठाणे ते नेरूळ दुपारी ३ : ०५
ठाणे ते वाशी दुपारी ३ : ५२
ठाणे ते पनवेल सायंकाळी ६ : १०
ठाणे ते नेरूळ दुपारी ५ : १६
ठाणे ते वाशी दुपारी ४ : १९
ठाणे ते पनवेल रात्री ९ : ३६
ठाणे ते नेरूळ रात्री ८ : २०
नेरूळ ते ठाणे रात्री ८ : ५८
पनवेल-नेरूळ-वाशी रेल्वे स्थानकांतून सुटणा-या गाड्या
लोकल वेळ
पनवेल ते ठाणे सकाळी ८ : १५
नेरूळ ते ठाणे दुपारी ३ : ४५
वाशी ते ठाणे दुपारी ३ : ११
पनवेल ते ठाणे सकाळी १० : १२
नेरूळ ते ठाणे दुपारी ५ : ५४
वाशी ते ठाणे दुपारी ४ : ३१
पनवेल ते ठाणे सायंकाळी ७ : १८
ट्रान्स हार्बर मार्गावरील या अतिरिक्त १६ फेºयांमुळे प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे.
तसेच सरकत्या जिन्यांचा लाभ ज्येष्ठांना आरम मिळण्यास मदत होणार आहे.
-खा. राजन विचारे