‘वृक्षवल्ली’ला लाखाहून अधिक लोकांची भेट; महापौरांच्या हस्ते पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:47 AM2020-01-14T00:47:11+5:302020-01-14T00:47:20+5:30
झाडे, फुले, फळे आणि भाजीपाला स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या बाराव्या वृक्षवल्ली २०२० या भव्य प्रदर्शनातील झाडे, फुले, फळे व भाजीपाला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते रविवारी पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. ठाण्याच्या रेमण्ड कंपनी मैदानात आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला तब्बल सव्वा लाखाहून अधिक लोकांनी भेट देऊन प्रदर्शनाची माहिती घेतली. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात झाडे, खते आणि अवजारे विकत घेतली असून झाडांचे संगोपन व्हावे, हा मूळ उद्देश असलेल्या या प्रदर्शनाचे सार्थक झाल्याची भावना महापौरांनी व्यक्त केली.
ठामपासोबतच मुंबई, मुंबई उपनगरे, बदलापूर, कल्याण-डोंबिवली या सर्वच शहरांतील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
झाडे, फुले, फळे आणि भाजीपाला स्पर्धेत एकूण ५० स्टॉल्सधारकांसह ६०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील प्रथम क्र मांक सेंट्रल रेल्वे, तर द्वितीय क्रमांक लोढा ग्रुपने पटकावला. याशिवाय, विविध विभागांत घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवलेल्या एकूण २५० स्पर्धकांना सन्मानचिन्ह देत गौरवले.
याप्रसंगी सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, ग्लोबल स्कूल व ठामपाच्या शाळा क्र . ५५ मधील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांद्वारे प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांना पर्यावरणपूरक माहिती दिली. ठामपाच्या शाळा क्र .५५ मधील विद्यार्थ्यांनी उभारलेल्या मातृृसेवा फाउंडेशनअंतर्गत टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या टेरेस गार्डनला नागरिकांनी भेट देऊन उपक्र माची माहिती घेतली.
यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, गटनेते दिलीप बारटक्के, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षा आशरीन इब्राहिम राऊत, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, महिला व बालकल्याण समिती सभापती जयश्री डेव्हिड, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे, चिवटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एस. पठाण, नगरसेविका साधना जोशी, नगरसेविका नम्रता फाटक, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्या नम्रता जाधव-भोसले, अंकिता जामदार, संगीता पालेकर, परिवहन समिती सदस्य राजेंद्र महाडिक, विक्र ांत तावडे, प्रकाश बेर्डे, सहायक आयुक्त चारूशीला पंडित, सहायक आयुक्त महादेव जगताप, वरिष्ठ उद्यान निरीक्षक केदार पाटील, युवा सेनेचे लांडगे आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनात शोभिवंत पानाफुलांच्या कुंड्या, वामनवृक्ष, कॅक्टस, सकुलंट, ब्रोमेलियाझ, आर्किड्स गुलाबपुष्प, पुष्परचना, औषध व सुगंधी वनस्पती, ब्राह्मी, पानफुटी, उंडी आणि डिंकामलीसारख्या अनेक औषधी वनस्पती, झुकिनी, गोवा बीन आदींचा समावेश होता.
यावेळी नवकोलसारखा भाजीपाला, तसेच समियासारख्या दुर्मीळ होत चाललेल्या वनस्पती, फळ, झाडे, फळांची मांडणी, उद्यान प्रतिकृती, निसर्ग व पर्यावरण आधारित छायाचित्र, रंगचित्र आदींच्या प्रदर्शनाचा नागरिकांनी आनंद घेतला.